News Flash

२५ पैसे भरपाई मागत राखी सावंतचा तनुश्रीविरोधात मानहानीचा दावा

मला तनुश्रीकडून २५ पैसे भरपाई हवी आहे कारण तिची तेवढीच लायकी आहे असे राखी सावंतने म्हटले आहे

संग्रहित छायाचित्र

२५ पैशांची नुकसान भरपाई मागत ड्रामा क्वीन राखी सावंतने तनुश्री दत्ताविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. #MeToo या मोहिमेत तनुश्री दत्ताने ‘हॉर्न ओके प्लीज’ च्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. मात्र तनुश्री दत्ताचे हे आरोप खोटे आहेत असं म्हणत राखी सावंतने तिच्यावर टीका केली आहे. तनुश्री प्रसिद्धीसाठी हे सगळे करत असल्याचेही तिने म्हटले आहे. या दोघींमध्ये शाब्दिक युद्ध काही संपताना दिसत नाहीये. काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत राखी सावंतने तनुश्री दत्ता लेस्बियन आणि ड्रग अॅडिक्ट आहे असा आरोप केला. तसेच तिने आपल्यावर बलात्कार केल्याचाही आरोप केला.

मात्र राखीने केलेले हे सगळे आरोप धादांत खोटे असून तिच्या  मेंदूवरही तिने प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे असा टोला तनुश्री दत्ताने लगावला आहे. २९ तारखेला या संदर्भातली बातमी समोर आली होती. ज्यानंतर दोनच दिवसात राखी सावंतने तनुश्री दत्ताविरोधात मानहानीचा दावा करत २५ पैसे भरपाई मागितली आहे. तनुश्री दत्ताकडून मला २५ पैसे नुकसान भरपाई हवी आहे कारण तिची तेवढीच लायकी आहे असेही राखी सावंतने म्हटले आहे.

मी ५० कोटींची भरपाई मागत तिच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करू. मात्र मला देवाने स्वप्न दाखवलं, स्वप्नातच मला देवाने हा मार्ग दाखवला आणि म्हणून मी भरपाई म्हणून फक्त २५ पैसे घ्यायचे ठरवले आहे कारण तनुश्री दत्ताची लायकीच तेवढी आहे असेही राखी सावंतने म्हटले आहे. तनुश्री दत्ताने ज्या चुका केल्या आहेत त्याचा भुर्दंड तिच्या आई वडिलांनी का सहन करायचा? हा विचार मी करते आहे. मात्र तनुश्रीने माझ्यावर टीका करणे थांबवले नाही तर मी तिच्याविरोधात ५० कोटीची भरपाई मागत नवा दावा दाखल करेन असेही राखी सावंतने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 6:52 am

Web Title: rakhi sawant sues tanushree dutta for defamation seeks 25 paise damages
Next Stories
1 ‘विकी डोनरमधल्या किसिंग सीनमुळे पत्नी झाली होती नाराज’
2 ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चे तिकीट दर वाढणार?
3 ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा
Just Now!
X