News Flash

…म्हणून ‘किस’ कॉन्ट्रोव्हर्सीला विसरुन राखीने धरले मिकाचे पाय

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत आणि गायक मिका सिंग २००६ मध्ये एका किसमुळे चर्चेत आले होते. मिकाने त्याच्या वाढदिवशी राखीला जबरदस्ती किस केलं अशी चर्चा सुरु झाली होती आणि त्यानंतर तो अडचणीत आला होता. राखीने मिका विरोधात विनयभंगाचा आरोप करत तक्रार केली होती. तर, मिकाने त्यावेळी स्पष्ट केले होते की राखीने आधी त्याला किस केले.

ही घटना जुनी असली तर सोशल मीडियावर बऱ्याचदा यावर चर्चा सुरु असते. मात्र, आता असे दिसते की हे दोघे आता त्या घटनेला विसरुन पुढे निघाले आहेत. आता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिका आणि राखी मिठी मारताना दिसतं आहेत. एवढंच नाही तर त्या दोघांनी एकमेकांची स्तुती केली. जेव्हा राखीने मिकाला तिच्याकडे येताना पाहिलं तेव्हा ती सिंग इज किंग, सिंग इज किंग बोलतं होती. तर, मिका म्हणाला की, “इथून जात असताना राखीला पाहिल्यानंतर तो दुर्लक्ष करु शकत नाही आणि बिग बॉस हे फक्त राखीमुळे लोकप्रिय झालं.”

आणखी वाचा : संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा?

राखीने मिकाला तिच्या आई विषयी सांगितले की कशा प्रकारे सलमानने तिला मदत केली. सलमानने तिच्या आईसाठी सगळ्यात चांगले डॉक्टर्स आणि सगळ्यात चांगली ट्रीटमेंटची व्यवस्था केली. एवढचं नाही तर राखीने रिपोर्ट्सला सांगितले की राखी आणि मिका आता चांगले मित्र आहेत. त्याच दरम्यान, राखीने मिकाचे पायला धरले आणि त्याची स्तुती करत म्हणाली, करोना संकटाच्या काळात मिका सिंगने अनेकांना मदत केली.

आणखी वाचा : “मला आणि कुटुंबाला करोना होऊच शकत नाही कारण…”, राखी सावंतचा अजब दावा

दरम्यान, राखी या आधी करोनावरील तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. राखी म्हणाली होती की, “देशात करोना व्हॅक्सिनची कमतरता आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की मला मिळणारी लस ही गरजूंना मिळाली पाहिजे. मला करोना होऊ शकतं नाही, कारण माझ्या शरीरात येशुचं पवित्र रक्त आहे. त्यामुळेच मला आणि माझ्या कुटुंबाला करोनाची लागण होणार नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 12:40 pm

Web Title: rakhi sawant touched mika singh feet and says we are friends now video goes viral on internet dcp 98
Next Stories
1 “मला बऱ्याचदा आधीच त्या पुरुषांचे मनसुबे लक्षात यायचे”, नीना गुप्ता यांचा खुलासा
2 Video: …अन् गडकरी ‘बिग बीं’ना म्हणाले, “नाटक मत कर, रख नीचे फोन”
3 पाकिस्तानची चेष्टा केल्याने झाली नाराज; प्रियकरासोबत ठरलेलं लग्न अभिनेत्रीने मोडलं
Just Now!
X