News Flash

राखीने शेअर केला शाहरुखसोबतचा फेक फोटो, नेटकरी म्हणाले…

सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी तिने शाहरुख खानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच तिला ट्रोल करण्यात आले आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शाहरुखसोबत व्हिडीओ कॉलवर बोलतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती शाहरुखसोबत बोलताना हसत असल्याचे दिसत आहे. तसेच हा फोटो शेअर तिने लोकांना मदत केल्याबद्दल शाहरुख तुझे आभार असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Thanks Dear Shahrukh for helping people

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

पण राखीने शेअर केलेला हा फोटो फेक असल्याचे नेटकऱ्यांना कळताच त्यांनी राखीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने, ‘दीदी हे थोडं जास्तच झालं, आता पुरे झालं’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुला फोटोशॉप योग्य पद्धतीने वापरता येते असे म्हटले आहे’ म्हटले. ‘ही तर हद्दच झाली. ते तुला फॉलो देखील करत नाहीत’ असे म्हणत राखीला सुनावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 5:58 pm

Web Title: rakhi sawant trolled for sharing fake photo with shah rukh khan avb 95
Next Stories
1 Viral Video: कमल हासन यांनी करोनावर तयार केलेलं गाणं ऐकलं का?
2 VIDEO : आईसाठी हा सुपरस्टार झाला शेफ; करतोय रोज नवनवीन पदार्थ
3 अभिनेत्रीची हटके आयडिया; घरात राहून केलं मासिकासाठी फोटोशूट
Just Now!
X