महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. शनिवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला धक्का देत भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला आणि सकाळीच शपथविधी उरकला. याला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने न्यायालयात आव्हान दिले आहे. या सर्व प्रकरणावर आता ड्रामा क्विन राखी सावंत हिने प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या राखी सावंत हिने महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या खेळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तिने इन्स्टाग्रमावर व्हिडीओ शेअर करुन प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

Aagye modi ji mai hu aadhe maa

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

“मी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना सांगितले होते एकमेकांविरोधात भांडू नका, आणि लवकरात लवकर सरकार स्थापन करा. परंतु त्यांनी माझे ऐकले नाही. आता बघा, अमित शाह यांनी शरद पवार यांना फोन करुन उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापनेचे सर्व मार्गच बंद करुन टाकले. या सर्व प्रकरणामागे मास्टर माईंड अमित शाह यांचा हात आहे.” असे राखी या व्हिडीओमध्ये म्हणाली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाही, म्हणून शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापन करण्याबद्दल एकमत झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावरही सहमती झाली होती. मात्र, भाजपानं अचानक शनिवारी सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण, मुख्यमंत्रीपदानं उद्धव ठाकरे यांना हुलकावणी दिल्याच्या नैराश्यातून एका शिवसैनिकांने आत्महत्येचा प्रयत्न केला.

राज्यात सरकार स्थापन करण्यावरून प्रचंड गोंधळ उडालेला आहे. भाजपानं सरकार स्थापन केलं असले तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं या शपथविधी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात एका शिवसैनिकानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाही, म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश बाळू जाधव असं या शिवसैनिकाचं नाव असून, ते वाशिम जिल्ह्यातील उमरी गावचा रहिवासी आहेत.

शनिवारी सायंकाळी रमेश जाधव हे काही कामानिमित्तानं वाशिमला आले होते. त्यानंतर हातावर ठिकठिकाणी ब्लेड मारलेल्या अवस्थेत ते शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला दिसले. हातावर ब्लेडनं वार केलेले असल्यानं जाधव हे अशक्त दिसत होते. त्यानंतर त्यांना शहरातील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं, असं दिग्रस पोलिसांनी सांगितलं.