24 November 2020

News Flash

Video : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते….

त्यांच्यापेक्षा लहानच नाही तर ती एक ग्लॅमरस अभिनेत्रीही आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’च्या बाराव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. जोडीदार या थीमसह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या शोमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे ‘भजन सम्राट’ अनूप जलोटा यांची. शोच्या पहिल्याच दिवशी आपलं नातं जगजाहीर करणाऱ्या जलोटा यांच्यावर सध्या सोशल मीडियावर अनेक मिम्स तयार होत असून राखी सावंतनेही त्यांच्या नात्याची खिल्ली उडविली आहे.

‘आयटम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री राखी सावंत हिने अनुप जलोटा आणि जस्लीन मथारू यांच्या वयातील अंतरावरुन सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत खिल्ली उडविली आहे. राखीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुप जलोटा यांच ‘ऐसी लागी लगन’ हे गाणंदेखील म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

My new song dedicated to my friend #anupjalota #biggboss12 #jasleenmatharu #bb12

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on

‘अनुप जलोटा यांचं कलाविश्वात चांगलंच नाव आहे. ते एक प्रसिद्ध व्यक्तीदेखील आहेत. मात्र त्यांचं वय पाहता या वयातही त्यांना प्रेयसी असेल असं वाटतं नाही. जस्लीन ही अनुप यांच्यापेक्षा बरीच लहान आहे. ती केवळ त्यांच्यापेक्षा लहानच नाही तर ती एक ग्लॅमरस अभिनेत्रीही आहे’, असं राखी म्हणाली आहे.
पुढे तिने ‘ऐसी लागी लगन’ गाणं म्हटलं असून या गाण्यात मीरा या नावाचा समावेश आहे. मात्र राखीने मीराच्या जागी जस्लीनचं नाव उच्चारलं आहे. इतकंच नाही तर अनुपजी आता तुमचं वय झालं आहे याची आठवणही तिने अनुप यांना करुन दिली आहे.

दरम्यान, राखीच्या या व्हिडिओनंतर अनेक नेटकऱ्यांनीही पुन्हा एकदा अनुप आणि जस्लीन यांच्या नात्याची खिल्ली उडविली आहे. बिग बॉसच्या मंचावर अनुप जलोटा यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. २८ वर्षीय जसलीन मथारु हीला गेल्या साडे तीन वर्षांपासून डेट करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2018 4:39 pm

Web Title: rakhi sawant videos on anup jalota will leave you shocked
Next Stories
1 पोलिसांवर मारहाणीचा आरोप, पालघरमध्ये गणेशभक्तांनी विसर्जन थांबवले
2 लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘गॅटमॅट’चा टीझर पोस्टर प्रदर्शित
3 प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणपतीच्या पुजेविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?
Just Now!
X