News Flash

म्हणून माझ्या बायोपिकमध्ये आलिया भट्टने मुख्य भूमिका साकारावी, राखी सावंतने व्यक्त केली इच्छा

खरचं आलिया साकारणार का राखीची भूमिका?

राखी सावंत ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. अनेक वेळा तिने केलेल्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी गीतकार जावेद अख्तर यांना राखीच्या जीवनावर चित्रपट बनवायचा होता असे ती म्हणाली होती. यानंतर जावेद अख्तर राखी जे बोलते ते सत्य असल्याचे सांगितले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माझ्या बायोपिकमध्ये आलियाने मुख्य भूमिका साकारली पाहिजे असे राखी म्हणाली आहे. या वक्तव्यामुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “माझ्या बायोपिकमध्ये आलिया भट्टने मुख्य भूमिका साकारावी अशी माझी इच्छा आहे. आलिया बोल्ड आहे, तिला कोणाचीही भीती वाटत नाही,” असे राखी म्हणाली. राखीचा विश्वास आहे की पडद्यावर जी अभिनेत्री तिची भूमिका साकारेल तिच्यात हा गुण असला पाहिजे. एवढंच नाही तर प्रियांका चोप्रा आणि राधिका आप्टे देखील तिची भूमिका उत्तम रित्या साकारू शकतात असे राखीला वाटते.

पुढे राखी म्हणाली, “प्रियांका चोप्रा आणि राधिका आप्टे देखील बोल्ड आहेत. मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मी कधीच माझा आत्मसन्मान कमी होई दिला नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक लक्ष्मणरेषा ओलांडल्या आणि आदरपूर्वक जीवन जगण्याचे मी काम केले आहे.”

जावेद अख्तर नक्की काय म्हणाले होते?

‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी राखीजे बोलते हे खरे असल्याचे सांगितले. जावेद अख्तर यांना विचारण्यात आले की, राखी म्हणाली की तुम्हाला तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा आहे हे सत्य आहे का? त्याला उत्तर देत जावेद अख्तर म्हणाले, “हो, ती खरं बोलत आहे. मला आठवतंय, आमची काही चार-पाच वर्षांपूर्वी विमानात भेट झाली. तिथे तिने मला तिच्या बालपणातील्या अनेक गोष्टी सांगितल्या आणि मी तिला सांगितले की एखाद्या दिवशी मला तुझ्या बायोपिकसाठी स्क्रिप्ट लिहायला आवडेल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 7:40 pm

Web Title: rakhi sawant wants alia bhatt to play her role in biopic calls her bold and bindaas dcp 98
Next Stories
1 स्मृती इराणींची भावूक पोस्ट; लग्नाच्या वाढदिवसाच्या पतीला दिल्या शुभेच्छा
2 आमिरनंतर ‘या’ अभिनेत्याने फिरवली सोशल मीडियाला पाठ!
3 सुझान नंतर बहीण फराहने देखील घेतला पतीसोबत विभक्त होण्याचा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली..
Just Now!
X