सध्याच्या बॉलिवूड सिनेमांमधून रक्षाबंधन हा सण भलेही गायब झाला असला तरी आधीच्या सिनेमांमध्ये हा सण आवर्जून दाखण्यात यायचा. अनेकदा हा सण दाखवलाच जायचा. कोणतेही कथानक पुढे नेण्यासाठी अशा सणांची मदत घेतली जायची. चला तर मग जाणून घेऊया अशा काही हिट सिनेमांमधील रक्षाबंधनचे अजरामर दृश्य-

अंधा कानून-
या सिनेमात सुपरस्टार रजनीकांत आपल्या बहिणीकडे म्हणजे हेमा मालिनीकडे राखी बांधायला जातात. यात हे भाऊ- बहिण एकमेकांसोबत मस्ती करताना दाखवण्यात आले आहेत. या सिनेमातले किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले ‘मेरी बहना…’ हे गाणेही फार हिट झाले होते.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
father of the year Viral Video Man Seen Shopping While Pushing his Babies Strollers on trolley
शेवटी वडिलांनाच लेकरांची काळजी! तीन चिमुकल्यांना ट्रॉलीवर बसवण्यासाठी तारेवरची कसरत, पाहा VIDEO

अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिंदी सिनेमा करण्यास नागराज मंजुळे सज्ज?

साजन का घर-
१९९४ मध्ये आलेल्या या सिनेमात जुही चावलाच्या भावाची भूमिका अभिनेता दीपक तिजोरीने साकारली होती. या सिनेमात तो जुहीचा सावत्र भाऊ दाखवण्यात आला होता. सिनेमात एका अपघातात दिपकला एक हात गमवावा लागतो. ‘माहेरची साडी’वरुन या सिनेमाची कथा बेतलेली होती. ज्या हाताला जुही राखी बांधते तो हात अपघातात बचावतो आणि दुसरा हात गमवावा लागतो. यावर दिपक म्हणतो की, दोन्ही हातांवर राखी बांधायची प्रथा असायला हवी होती.

धर्मात्मा-
या सिनेमात फिरोज खान आणि फरीदा जलाल हे भाऊ- बहिण दाखवण्यात आले आहेत. ‘द गॉडफादर’ सिनेमापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या सिनेमाची कथा अशावेळी रंजक होते जेव्हा फिरोज खानला त्याच्या वडिलांचा खऊन हा बहिणीच्या नवऱ्यानेच केल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर फरीदा जलाल आपल्या भावाची माफीही मागते.

सनम बेवफा-
सावन कुमार याच्या या सिनेमात राखीशी संबंधित एक सुंदर सीन चित्रीत करण्यात आला आहे. सिनेमात एक मुसलमान मुलगी आपल्या हिंदू मैत्रिणीच्या भावाला राखी बांधते. आपल्या सख्या भावापेक्षाही कणभर जास्तच प्रेम तिचं या मानलेल्या भावासाठी असतं. या सिनेमाचा क्लायमॅक्स फारच रंजक दाखवण्यात आला आहे. यात सलमान खान आणि कंचन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ही आहेत बॉलिवूडमधील रक्षाबंधनची सदाबहार गाणी

प्यार किया तो डरना क्या-
अरबाज खान आणि काजोल यांच्यामध्ये एक राखीचे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे. अरबाजला आपल्या बहिणीची फार काळजी असते. हा सिनेमा तेव्हा फार गाजला होता. या सिनेमातील गाणीही लोकांच्या अजून लक्षात आहेत.

रेशम की डोरी-
या सिनेमातले ‘बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है’ हे गाणे फार हिट झाले होते. सिनेमात धर्मेंद्रची बहिण त्यांना तेव्हा राखी बांधते जेव्हा पोलीस त्यांना अटक करत असतात. त्यांच्या हातात बेड्या आणि राखी एकत्र बांधलेल्या असतात असं नाट्यमय चित्रीकरण करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांच्यावर बहिणीची छेड काढणाऱ्या मुलांना बेदम मारण्याचा आरोप असतो.

हम साथ साथ है-
अभिनेत्री नीलम या सिनेमात सलमान खान, सैफ अली खान आणि मोहनीश बहल यांची बहिणी दाखवली आहे. तीन भावांना राखी बांधतानाचा तो सीन फारच लोकप्रिय झाला होता. कौटुंबिक सिनेमा करण्यास प्राधान्य देणाऱ्या सुरज बडजात्या यांच्या या सिनेमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मल्टिस्टारर या सिनेमात तब्बू, करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.