News Flash

Raksha Bandhan 2017: निर्मिती – कमलेशचे हे रेशमी बंध

नको तिथे नको ते बोलणा-या भावाला आपल्या धाकात ठेवणारी ही बहिण

कमलेश सावंत, निर्मिती सावंत

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटातून भाऊ-बहिणीची भूमिका साकारणारे अभिनेते कमलेश सावंत आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी रिल लाईफ नातं रिअल लाईफमध्ये निभावून प्रेमाची नाती कुठेही जुळतात याचं प्रात्यक्षिकचं दिलं आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने निर्मितीने कमलेश सावंत यांना ‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती’ म्हणत स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी सोपवलेली आहे.

वाचा : रक्षाबंधनच्या दिवशी ‘या’ व्यक्तीच्या शुभेच्छांची वाट पाहात असतो शाहरुख

भाऊ-बहिणीचं नातं हे प्रेमाच्या नितळ अन् निखळ आठवणींनी भरलेलं असतं. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेटलेले कमलेश आणि निर्मिती ऑनस्क्रीन भाऊ-बहिणीची भूमिका साकारत असताना ऑफस्क्रीन देखील मजा-मस्ती करत भाऊ-बहिणीच्या भूमिकेतच वावरत असल्याचं दिग्दर्शक समीर विद्वांसने सांगितलं. इतकी गोड, प्रेमळ आणि नटखट बहीण असेल तर या बहिणीच्या मायेपासून कोण कसं दूर राहू शकेल? टॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाच्या सेटवर उदयाला आलेलं हे नातं चित्रीकरणानंतर ही टिकून आहे, म्हणूनच रक्षाबंधनाच्या निमित्ताने या गोंडस अशा बहिणीच्या मायेला भुलून वेळात वेळ काढून कमलेश यांनी आपल्या बहिणीला म्हणजेच निर्मिती ताईला तिच्या ‘जाडूबाई जोरात’ मालिकेच्या सेटवर जाऊन सरप्राईज दिलं.

वाचा : अर्पिता- अलविराशिवाय सलमानला आहे आणखी एक बहिण

या गोड नात्यातल्या धाकाची जाणीव करून देताना कमलेश म्हणाले की, ‘या बहिण – भावाच्या नात्याची सुरुवात मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपटातून झाली, नको तिथे नको ते बोलणा-या भावाला आपल्या धाकात ठेवणारी ही बहिण… तिने ऑनस्क्रीन बरोबरच ऑफस्क्रीनदेखील आपल्या भावाला (मला) सांभाळून घेतलं. या बहिण – भावाच्या संवादात होणारे हलके – फुलके विनोद तुम्ही चित्रपटात पाहू शकणार आहात.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 8:20 am

Web Title: raksha bandhan 2017 onscreen brother and sisiter kamlesh sawant nirmiti sawant become siblibngs in real life
Next Stories
1 शाहरुखने फ्रेंडशिप डेच्या दिवशी असा पाळला आमिरचा शब्द
2 अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दोघांनाही स्वाईन फ्लूची लागण
3 ….म्हणून अक्षयने तिचं कधीच ऐकलं नाही
Just Now!
X