News Flash

‘माझा होशील ना’ मालिकेच्या सेटवर साजरं झालं रक्षाबंधन

मालिकेच्या सेटवर ही मंडळी एका कुटुंबाप्रमाणेच वागतात.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. लॉकडाउननंतर या मालिकेच्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मालिकेच्या पडद्यामागचे कलाकार व क्रू मेंबर्स यांची राहण्याची सोय ही सेटवरच करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधनसाठी ही मंडळी आपापल्या घरी जाऊ शकणार नाहीत, नातेवाईकांना भेटू शकणार नाहीत. म्हणूनच मालिकेच्या सेटवरच रक्षाबंधन साजरा करण्यात आला आहे.

‘सई’ म्हणजेच गौतमी देशपांडे हिने सेटवर काम करणारे स्पॉट दादा, मेकअप दादा, लाईट दादा, आणि आता करोना काळात सर्वांच्या सुरक्षेची तपासणी करणारे कर्मचारी जे शूट सुरू होण्यापूर्वी व शूट संपल्यानंतर सर्वांना व सेटला सॅनिटाइज करतात, त्यांना राखी बांधली.

२४ तासांतले अनेक तास ही कलाकार मंडळी एकमेकांसोबत असतात. त्यामुळे मालिकेच्या सेटवर ही मंडळी एका कुटुंबाप्रमाणेच वागतात. करोनाचं संकट जरी असलं आणि कुटुंबापासून दूर जरी असले तरी रक्षाबंधन साजरा व्हावा, यासाठी गौतमीने सेटवरच्या सर्व दादांना राखी बांधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 4:40 pm

Web Title: raksha bandhan celebrated on the sets of majha hoshil na ssv 92
Next Stories
1 सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या कुटुंबीयांची बिहार पोलीस करणार चौकशी
2 अभिनेत्रीच्या इन्स्टा लाइव्हमध्ये युजवेंद्र चहलची कमेंट
3 ६०० बॅकग्राऊंड डान्सरसाठी जॅकी भगनानीच्या मदतीचा हात
Just Now!
X