19 September 2020

News Flash

Video : पीपीई किट घालून ‘या’ अभिनेत्रीनं केला विमानप्रवास

पाहा, कोण आहे ही अभिनेत्री

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरु होता. मात्र काही दिवसापूर्वीच ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील विस्कटलेली घडी हळूहळू सुरळीत होताना दिसत आहे. यामध्येच आता मुंबईकरही त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडू लागले असून सेलिब्रिटींदेखील बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. यात एका अभिनेत्रीने पीपीई किट घालून विमानप्रवास केल्याचं समोर आलं आहे. सध्या या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हे नाव कलाविश्वासाठी आणि चाहत्यांसाठी नवीन नाही. याच रकुल प्रीतने पीपीई किट घालून विमानप्रवास केल्याचं समोर आलं आहे. अलिकडेच रकुलला मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. यावेळी तिने पीपीई किट आणि चेहऱ्यावर मास्क लावलं होतं. विशेष म्हणजे या गेटअपमध्ये तिला कोणी ओळखणार नाही असं तिला वाटलं होतं. मात्र छायाचित्रकारांनी तिला पाहताच क्षणी ओळखलं आणि तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली.


विमानतळाच्या आत प्रवेश करण्यासाठी रकुलप्रीत गाडीतून उतरल्यानंतर तिची छबी कॅमेरात कैद करण्यासाठी अनेक छायाचित्रकार पुढे सरसावले आणि त्यांनी रकुलला पोझ देण्यास सांगितलं. मात्र ही बाब रकुलला फारशी रुचली नाही. ‘काय इकडे पाहा? कृपा करुन हे सारं करु नका’, असं रकुलप्रीत म्हणाली.

दरम्यान, रकुलप्रीत ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर केली होती. तसंच रकुल आणि अजय देवगणसह या चित्रपटात अभिनेत्री तब्बूदेखील झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 10:37 am

Web Title: rakul preet singh appeared in ppe suit said guess who did i meet ssj 93
Next Stories
1 ‘गुलाबो सिताबो’मधील बेगम ठरते लोकप्रिय; जाणून घ्या कोण आहेत त्या!
2 मीरासाठी शाहिद कपूर पहिल्यांदाच झाला शेफ; तयार केला ‘हा’ पदार्थ
3 सोनू सूद नव्या जाहिरात नायकाच्या अवतारात
Just Now!
X