‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’ आणि ‘वेडय़ांचा बाजार’ अशा अजरामर नाटकांनी मराठी वाङ्मयात मोलाची भर घालणारे नाटककार आणि भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचे समग्र साहित्य लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. गडकरी यांच्या स्मृतिशताब्दीचे औचित्य साधून राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे गडकरी साहित्याचे पुनप्र्रकाशन करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.

वाचा : नाटय़ परिषद पंचवार्षिक निवडणूक मोहन जोशी यांचा अर्ज बाद

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

ज्या पुण्यात राम गणेशांनी आपले आयुष्य व्यतीत केले, तेथीलच महाराष्ट्र साहित्य परिषदेला मात्र या शताब्दीचा गंधही नाही. पुण्यात एकाही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही. ज्यांच्या महाराष्ट्र गीताने प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येते, त्याचीही आठवण या थोडय़ाच साहित्यसेवी संस्थांना आहे.

गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष मंगळवारपासून (२३ जानेवारी) सुरू होत आहे. राज्य शासनातर्फे गडकरी यांच्या स्मृती जागविणारा कोणताही कार्यक्रम मंगळवारी होणार नसला तरी सांस्कृतिक विभागातर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भाषाप्रभूंच्या समग्र साहित्याचे पुनप्र्रकाशन करण्यात येणार आहे. भिलार (जि. सातारा) येथील ‘पुस्तकांच्या गावा’मध्ये गडकरी यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

वाचा : ‘पॅडमॅन’साठी अक्षयने हाती घेतला एबीव्हीपीचा झेंडा

पुतळा केव्हा बसविणार?
गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकातील संवादाला आक्षेप घेत काही समाजकंटकांनी पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा मागील वर्षांच्या जानेवारी महिन्यात उखडून टाकला होता. त्याविरोधात साहित्यिक आणि नाटककारांनी आंदोलनही केले होते. एवढेच नव्हे, तर काही कलाकारांनी महापालिकेला भेट देण्यासाठी गडकरी यांचा पुतळा करून घेतला होता. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर हा पुतळा पूर्ववत बसविला जाईल, अशी ग्वाही शहर भाजप नेत्यांनी दिली होती. मात्र, आता स्मृतिशताब्दी वर्षांस प्रारंभ होत असताना गडकरी यांचा पुतळा केव्हा बसविला जाणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. पुण्यातील कसबा पेठेतील िपपळाच्या झाडासमोरील वाडय़ामध्ये असलेले गडकरी यांचे घर काळाच्या ओघात गेले. मात्र, त्याजागी नीलफलक बसविण्याची तसदीही घेतली नाही. आता पुतळ्याच्या रूपाने गडकरी यांचे अस्तित्वही पुसले गेले आहे.