News Flash

राम गोपाल वर्माने केली दीपिकाची पॉर्न अभिनेत्री मिया मालकोवाशी तुलना

रामूच्या या ट्विटनंतर तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला

दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांचा ‘पद्मावत’ सिनेमा २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. ‘पद्मावत’ सिनेमासोबत अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ सिनेमाही प्रदर्शित होणार होता. मात्र अक्षयने सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ९ फेब्रुवारी केली. तुम्हाला वाटत असेल की जानेवारीमध्ये प्रदर्शित होणारा ‘पद्मावत’ हा शेवटचा सिनेमा असेल. पण तसे नाही २६ जानेवारीला राम गोपाल वर्माचा च्या शेवटच्या ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. रामूने नुकतेच या संदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने दीपिकाची तुलना पॉर्न अभिनेत्री मियाशी केली. जी सर्वोत्तम महिला असेल तिच जिंकेल असे त्याने ट्विटमध्ये म्हटले. ‘दीपिकाच्या पद्मावतसोबत माझा ‘गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ’ सिनेमा २६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. मिया मलकोवा आणि दीपिका पदुकोणमध्ये जी सर्वोत्कृष्ट असेल ती जिंकेल. #गॉडसेक्सट्रुथ’

रामूच्या या ट्विटनंतर तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला. अनेकांनी या ट्विटवर आक्षेप घेतला. एका युझरने म्हटले की, ‘दीपिका आणि मियाची तुलना करुन तुम्ही ही लढाई सुरू होण्याआधीच जिंकलात.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘वादग्रस्त सिनेमाच्या विरोधात वादग्रस्त सुख.’

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ सिनेमाचीच चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसत आहे. हा सिनेमा कोणत्याही विघ्नांशिवाय प्रदर्शित होईल का असाच प्रश्न आता अनेकांना पडला आहे. ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा राजपूत करणी सेनेचा विरोधही वाढताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 1:57 pm

Web Title: ram gopal varma announce mia malkova starrer movie date release with deepika padukone movie padmaavat
Next Stories
1 Padmaavat Box Office Prediction: ‘पद्मावत’ चार दिवसांत करणार इतक्या कोटींची कमाई!
2 पुन्हा एकदा करणी सेनेचे यू-टर्न; ‘पद्मावत’ सिनेमा पाहण्यास नकार
3 प्रेयसी सान्याशी प्रतिक बब्बर झाला ‘जस्ट एन्गेज्ड’
Just Now!
X