बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हा त्याच्या वक्तव्याने आणि ट्विटमुळे नेहमीचं वादाच्या भोव-यात सापडतो. दोन दिवसांपूर्वीदेखील त्याने असेच काहीसे ट्विट केले असून यावेळी त्याने मोदी सरकारवर निशाणा साधला. त्याने मोदी सरकार आणि पॉर्नच्या दुनियेतून बॉलीवूडकडे वळलेली सनी लिओनी यांची तुलना केली. ‘भारतीय जनतेला मोदी सरकार आणि सनी लिओनी यांच्यापैकी जास्त आनंद कोण देईल? ‘ असा प्रश्न त्याने नेटिझन्सना विचारला होता. त्यावर ७७ टक्के लोकांनी सनीच्या बाजूने कौल दिला. तर २३ टक्के लोकांनी सरकारच्या बाजूने कौल दिला.

राम गोपाल वर्मा इतक्यावरचं नाही थांबला. तर त्याने खासगीत तुम्हाला बौद्धिक संभाषण करण्यासाठी सनी योग्य वाटते की दीपिका पदुकोण? सर्वाधिक प्रामाणिक कोण आहे, सनी लिओनी की कर्नाटकाच्या विधानसभेत पॉर्न व्हिडिओ पाहाणारा तो आमदार ?  असेही प्रश्न नेटिझन्सना केले.