करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या प्राणघातक विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना करोनाची लागण झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र या चर्चांवर स्वत: राम गोपाल वर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी बिलकूल आजारी नाही, माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवणं कृपया थांबवा, अशी विनंती त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना केली आहे.

अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

राम गोपाल वर्मा आजारी नाहीत. ही माहिती त्यांनी एका व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे. “माझ्याबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. मी आजारी आहे, मला ताप येतोय, सर्दी झालीय असे काही लेख लिहिले जात आहेत. परंतु या केवळ अफवा आहेत. मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दररोज व्यायाम करतोय. आणि एका जबरदस्त चित्रपटावर सध्या काम करतोय. त्यामुळे कृपया माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवणं थांबवा.” अशी माहिती राम गोपाल वर्मा यांनी दिली आहे.

…तर रणबीरला ‘रेपिस्ट’ आणि दीपिकाला ‘सायको’ का नाही म्हणत? कंगनाने विचारला प्रश्न

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.