20 September 2020

News Flash

‘बाहुबली २’ चारवेळा पाहिल्यानंतर रामूची ‘ट्युबलाइट’वर कमेंट

त्याने 'ट्युबलाइट' आणि 'बाहुबली २' या दोन सिनेमांची तुलना केली आहे

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

‘बाहुबली २’ सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सध्या बाहुबलीचीच चर्चा सर्वत्र सुरू असताना, काल सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला. बाहुबलीसारखाच यंदाचा बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणून सलमानच्या ‘ट्युबलाइट’कडे पाहिले जातेय. त्यामुळे सलमानच्या ट्युबलाइटची चर्चा सगळीकडेच पाहायला मिळतेय.

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत येणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्माने या टिझरवर आपलं मत स्पष्ट केलं आहे. त्याने ‘ट्युबलाइट’ आणि ‘बाहुबली २’ या दोन सिनेमांची तुलना केली आहे. रामूने ट्युबलाइटचा टिझर शेअर करताना म्हटले की, ”बाहुबली २’ सिनेमा चौथ्यांदा बघून बाहेर पडतोय आणि आता ट्युबलाइटचा टिझरही पाहिला.’

त्याच्या या ट्विटवरून रामू ‘बाहुबली २’ सिनेमाचं कौतुक करत आहे हे तर स्पष्ट होतं. ‘ट्युबलाइट’ आणि ‘बाहुबली २’ मध्ये प्रेक्षकांनीच तुलना करावी असा छुपा संदेश रामू त्याच्या ट्विटमधून देत आहे. त्यामुळे रामूने विचारपूर्वक हे ट्विट केलं असंच म्हणावं लागेल. त्याच्या पुढच्या ट्विटमध्ये त्याने फिल्म मेकिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बाहुबली २’ बघण्याचा सल्ला दिला. रामू म्हणाला की, ‘चित्रपट संस्थांमध्ये लाखो रुपये आणि अनेक वर्षे फुकट घालवण्यापेक्षा २०० रुपयात आणि फक्त २ तासांत ‘बाहुबली २’ बघून तुम्ही २००० टक्के जास्त ज्ञान मिळवू शकता.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 6:03 pm

Web Title: ram gopal varma compares salman khans tubelight with rajamoulis baahubali 2
Next Stories
1 ‘हर हर महादेव’ म्हणत ‘जाबाज ज्युलियाने’ केली गंगा आरती
2 राजकुमारच्या लग्नमंडपावर २ कोटी रुपयांचा खर्च!
3 अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेतोय ‘बाहुबली’
Just Now!
X