News Flash

रामगोपाल वर्मा झाला राधिका आपेटवर फिदा!

यापूर्वी रामगोपाल वर्माने श्रीदेवी माझे क्रश असल्याची जाहीर कबुली दिली होती.

बॉलीवूड इंडस्ट्रीत दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांप्रमाणे त्याच्या बेधडक विधानांसाठीही प्रसिद्ध आहे. यापूर्वी रामगोपाल वर्माने अभिनेत्री श्रीदेवी, रजनीकांत आणि शाहरूख खान यांच्यासंदर्भात खळबळजनक विधाने केली होती. यावेळी रामगोपाल वर्माने अभिनेत्री राधिका आपटेविषयीच्या आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त केल्या आहेत. ही विधाने पाहता रामगोपाल वर्मा राधिका आपटेवर पूर्णपणे फिदा झालायं, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
श्रीदेवी माझे ‘क्रश’, बोनी कपूर यांना मी कधीच माफ करणार नाही- राम गोपाल वर्मा 
रामगोपाल वर्माने काही मासिकांच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झालेल्या राधिकाची छायाचित्रे ट्विट करून ‘आम्ही बिचाऱ्या पुरूषांनी जगायचे तरी कसे, तू आमच्यावर अशाप्रकारे सूड उगवणार आहेस का’, असा कौतुकपर संदेश लिहला आहे. रामगोपाल वर्माच्या या विधानामुळे आता इंडस्ट्रीत नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. यापूर्वी रामगोपाल वर्माने श्रीदेवी माझे क्रश असल्याची जाहीर कबुली दिली होती.
‘…तर सलमान खान शाहरूखचा स्टारपदाचा मुकूट हिरावून घेईल’ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2016 5:18 pm

Web Title: ram gopal varma is head over heels for radhika apte shares her pics on twitter
Next Stories
1 पाहा: रणवीर आणि वाणीच्या ‘बेफिकरे’चा फर्स्ट लूक
2 डॅडींपेक्षा माझ्या चित्रपटाची शैली पूर्णपणे वेगळी – आदिनाथ कोठारे
3 महोत्सवांमध्ये गौरवलेला ‘कोती’ प्रदर्शनासाठी सज्ज!
Just Now!
X