राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारा हा दिग्दर्शक आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट करोना विषाणूवर आधारित आहे.

अवश्य पाहा – पत्रकाराने केवळ ४६ रुपयांमध्ये मीडिया कंपनीला घेतलं विकत

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटव्दारे या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यावर भर दिला जात आहे. हे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे नेमकं काय? याचा माणसांच्या नातेसंबंधांवर कसा परिणाम होत आहे. चित्रपटाचं कथानक या प्रश्नांवर आधारित आहे. या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरु आहे.

अवश्य पाहा – गर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो…

यापूर्वी राम गोपाल वर्मा ‘क्लायमॅक्स’ या चित्रपटामुळे चर्चेत होते. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात पॉर्नस्टार अभिनेत्री मिया माल्कोवा मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तिने यापूर्वी राम गोपाल वर्मा यांच्या ‘गॉड सेक्स अँड ट्रूथ’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने केलेला अभिनय त्यांना खुप आवडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्यासोबत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.