News Flash

‘अर्णब- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’; संतापलेल्या राम गोपाल वर्मांनी थेट केली चित्रपटाची घोषणा

राम गोपाल वर्मा यांनी अर्णब गोस्वामींवर साधला निशाणा

राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, ‘रंगीला’, ‘अटॅक ऑफ २६/११’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारा हा दिग्दर्शक आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या पत्रकारीकेवर आधारित असेल असं म्हटलं जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या आगामी चित्रपटाचं नाव त्यांनी ‘अर्णब- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’ असं ठेवलं आहे.

अवश्य पाहा – सोनू सूदच्या साथीदाराला पोलिसांनी मारली होती थोबाडीत; कारण…

“माझ्या नव्या चित्रपटाचं नाव आहे, ‘अर्णव- द न्यूज प्रॉस्टिट्यूट’. प्रचंड विचार केल्यानंतर ‘द न्यूज पिंप’ व ‘द न्यूज प्रॉस्टीट्यूट’ ही दोन नावं मला सुचली. खरं तर दोघांचा अर्थ एकच आहे. पण मला ‘द न्यूज प्रॉस्टीट्यूट’ हे नाव जरा जास्त चांगलं वाटलं.” अशा आशयाचं ट्विट करुन राम गोपाल वर्मा यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

अवश्य पाहा – नैराशावर अशी करा मात? अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय

राम गोपाल वर्मा गेल्या काही काळात सातत्याने पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात टीका करत आहेत. अलिकडेच त्यांनी एक वादग्रस्त ट्विट करुन खळबळ उडवली होती. “आदित्य चोप्रा, करण जोहर, महेश भट्ट, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासह अनेकांना माझा एक सल्ला आहे. केवळ चित्रपटांसाठी हिरो तयार करणं आणि चित्रपटात हिरो होणं इतकंच गरजेचं नाही. तर अर्णब गोस्वामीसारख्या खलनायकाविरुद्ध आवाज उठविणंदेखील तितकंच गरजेचं आहे”, अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी अर्णब गोस्वामींवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 5:01 pm

Web Title: ram gopal varma new movie arnab goswami arnab the news prostitute mppg 94
Next Stories
1 नैराशावर अशी करा मात? अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय
2 लाइव्ह सेशनमध्ये शहनाजने उगारला सिद्धार्थवर हात, व्हिडीओ व्हायरल
3 ‘साहो’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत अडकला लग्न बंधनात
Just Now!
X