आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आज (गुरुवारी) पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडोजण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. या घटनेवर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दूर्घटनेला देवच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “होय, मी लॉकडाउनमध्ये केलं शुटींग, तुम्हाला काही अडचण आहे का?”; बच्चन संतापले

सर्वाधिक वाचकपसंती – “बॉलिवूडमध्ये कोणीही जबरदस्ती करत नाही”; अभिनेत्रींने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

“ईश्वर प्रत्येक गोष्टीचा निर्माता आहे. तोच निसर्गातील प्रत्येक गोष्टीला नियंत्रित करतो. त्याच्या इशाऱ्याशिवाय व्हायरस किंवा गॅस पसरु शकत नाही. परंतु आपण या घटनांना देवाला जबाबदार धरत नाही, कारण आपण त्याला घाबरतो.” अशा आशयाचे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे.

एलजी पॉलिमर कंपनीतून विषारी वायू गळती झाली. ज्यामुळे आसपासच्या तीन किलोमीटर अंतरावरील परिसरावर याचा परिणाम जाणवला. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी वी विनय चंद हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांनी सांगितले की, काहीजणांना श्वसनास त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन दिला जात आहे. या दुर्घटनेमुळे बेशुद्ध पडलेले तसेच श्वसनास त्रास होऊ लागलेल्या शेकडो जणांना शहरातली किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलं व वृद्धांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. तसेच, दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.