News Flash

“उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार”, वर्षभरानंतर कंगनाच्या ‘या’ वक्तव्यावर राम गोपाल वर्मा झाले व्यक्त

"कुणाच्या भावना दुखावू नये"

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. या वक्तव्यांमुळे कंगनाला अनेकदा ट्रोल केलं जातं. गेल्या वर्षी सोशल मीडियावर कंगना आणि उर्मिला मातोंडकरमध्ये वाद रंगला होता. यावेळी कंगनाने उर्मिला मातोंडकरवर केलेल्या एका विधानावरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी वर्षभरानंतर नाराजी व्यक्त केलीय. बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असलं तरी त्यामुळे आपण कुणाच्या भावना दुखावू नये असं राम गोपाल वर्मा म्हणाले आहेत.

गेल्या वर्षी एक वादामुळे कंगना रणौतने उर्मिला मातोंडकरचा उल्लेख ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ असा केला होता. बॉलिवूड बबलशी बोलताना कंगनाच्या या विधानावर राम गोपाल वर्मांनी नाराजी दर्शवली आहे. या मुलाखतीत ते म्हणाले, ” कंगना रणौतच्या या प्रकारच्या वक्तव्याने मला खूप त्रास झाला. बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवं मात्र ते आक्रमक नसावं. कंगना उर्मिलाबद्दल काय विचार करते हे तिचं मत आहे. यावर मी काही बोलणारही नाही. मात्र एक दिग्दर्शक म्हणून मी उर्मिलाचं काम पाहिलं आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आणि कलाकार आहे.” असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

वाचा : “बिग बॉसमध्ये खरोखरच अभिनव शुक्लाबद्दल ओढ निर्माण झाली”; राखी सावंतचा खुलासा

कंगना आणि उर्मिलामध्ये सोशल मीडिया वॉर

गेल्या वर्षी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सडकून टीका केली होती. यावेळी कंगनाच्या या आरोपांवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर एका मुलाखतीत उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाचा खरपूस समाचार घेतला होता. त्यालाच उत्तर देत कंगनाने उर्मिला यांना ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं.“उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” या शब्दात कंगनाने उर्मिला मातोंडकरवर टीका केली.

कंगनाच्या या प्रतिक्रियेनंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील टीका करत उर्मिलाचं समर्थन केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 11:35 am

Web Title: ram gopal varma open ups on kangana ranaut allegations on urmila matondkar when she said urmila is soft porn star kpw 89
Next Stories
1 “बिग बॉसमध्ये खरोखरच अभिनव शुक्लाबद्दल ओढ निर्माण झाली”; राखी सावंतचा खुलासा
2 इंजिनिअरींग ते बॉलिवूड; विकी कौशलचा ‘जोश’पूर्ण प्रवास
3 अमिताभ बच्चन यांनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस; ‘या’ कारणासाठी चाहत्यांची मागितली माफी
Just Now!
X