30 September 2020

News Flash

राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर

'ही' पॉर्नस्टार झळकणार भारतीय चित्रपटात

राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारा हा दिग्दर्शक आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे.

या आगामी चित्रपटाचं नाव ‘क्लायमॅक्स’ असं आहे. हा एक हॉरर अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात पॉर्नस्टार अभिनेत्री मिया माल्कोवा मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तिने यापूर्वी राम गोपाल वर्मा यांच्या ‘गॉड सेक्स अँड ट्रूथ’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिने केलेला अभिनय त्यांना खुप आवडला होता. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्यासोबत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

रामगोपाल वर्मा यांनी मिया माल्कोवाच्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली आहे. “मिया ही माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे तिच्यासोबत मी ‘क्लायमॅक्स’ या थरारपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील तिचा अभिनय पाहून तुम्ही दखील नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेल १८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:50 pm

Web Title: ram gopal varmas climax teaser with mia malkova mppg 94
Next Stories
1 गरजुंच्या मदतीसाठी ‘दबंग गर्ल’ आली पुढे; कलेच्या माध्यमातून करणार आर्थिक सहाय्य
2 ‘कहानी घर घर की’ मालिकेतील अभिनेत्याचं निधन
3 ..म्हणून अनन्याने सुहानाकडे उधारीवर मागितला टॉप
Just Now!
X