News Flash

राम गोपाल वर्मा यांनी शेअर केला ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड फोटो, झाले ट्रोल

सध्या सोशल मीडियावर याच अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चित्रपटांसोबतच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी विशेष ओळखले जातात. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमधील अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे म्हटले जाते. नुकताच त्यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहेत. ‘ही अप्सरा राणी ओडीसामध्ये राहाणारी एक मुलगी आहे. मी ओडीसामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आवाहन करतो की हिच्या पेक्षा चांगल्या मुलीचा फोटो शेअर करा’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

त्यांनी फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर काही वेळातच राम गोपाल वर्मा यांनी ट्विट डिलिट केले आहे. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी तिचे आणखी फोटो शेअर करत ती त्यांच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले आहेत.

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री राम गोपाल वर्मा यांचा आगामी चित्रपट ‘थ्रिलर’मध्ये भूमिका साकारणार आहे. तिचे नाव अप्सरा राणी आहे. तसेच या चित्रपटातून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘थ्रिलर’ हा चित्रपट क्लायमॅक्स आणि नेकेडच्या यशानंतरची कहाणी आहे असे राम गोपाल वर्मा यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

अप्सरा राणीने Oollalla Oollalla, 4 Letters सारख्या चित्रपटात काम केले आहे. आप्सरा राणी अभिनयासोबत एक उत्कृष्ट डान्सरही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 4:42 pm

Web Title: ram gopal verma tweeted actress bold photo avb 95
Next Stories
1 वैशाली सामंत यांचं ‘सुवासिनी’ गाणं ऐकलंत का ?
2 संजय मोनेंसाठी मित्राने चक्क ट्रेन थांबवून ठेवली होती; कारण…
3 अनिल कपूर यांची बॉडी पाहून इंप्रेस झाला हृतिक, म्हणाला…
Just Now!
X