News Flash

राम लीलाच्या प्रदर्शनावर उत्तर प्रदेशात बंदी

संजय लीला भन्सालीचा 'राम लीला' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, तरीही या चित्रपटामागचे वाद अद्याप काही संपुष्टात आलेले नाही.

| November 22, 2013 12:31 pm

संजय लीला भन्सालीचा ‘राम लीला’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, तरीही या चित्रपटामागचे वाद अद्याप काही संपुष्टात आलेले नाही. अलाबाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने ‘गोलियो की रासलीलाः राम लीला’ चित्रपटाच्या उत्तर प्रदेशातील प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
न्यायाधीश देवी प्रसाद सिंह आणि अशोक पाल सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बहारिच येथील मर्यादा पुरूषोत्तम भगवान रामलीला समितीने या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. चित्रपटाला राम लीला असे शीर्षक देऊन त्यात बिभत्स आणि हिंसक दृश्ये दाखविण्यात आली आहेत.  
१५ नोव्हेंबरला ‘राम लीला’ प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 12:31 pm

Web Title: ram leela banned in uttar pradesh
Next Stories
1 बिग बॉस ७- तनिषा-अरमानचं चाललयं काय?
2 जगण्यातला सूर ढळू न देणारा ‘सूर राहू दे’
3 फिल्मी मॉल
Just Now!
X