करोनामुळे देशभरात लॉकडाउन असल्याने लोक घऱात अडकले आहेत. चित्रपट, मालिका यांचं दिग्दर्शन रखडलं असल्याने अनेक चॅनेलवर जुन्या मालिका पुन्हा दाखवल्या आहेत. त्यात दूरदर्शनने पुन्हा एकदा रामायण प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांना जुन्या दिवसांची आठवण झाली. अरुण गोवील यांनी रामायणामध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका निभावली होती. आज ३३ वर्षानंतरही लोकांच्या मनात आपली भूमिका तितकीच ताजी असल्याचं पाहून आपल्याला आश्चर्य वाटतं असं ते म्हणतात.

१९८७ मध्ये रामायण दूरदर्शनवर प्रसारित झालं होतं. अरुण गोवील यांच्यासहित सीतेची भूमिका निभावणाऱ्या दीपिका आणि लक्ष्मणाची भूमिका निभावणारे सुनील लहरी यांना लोकांनी अक्षरश: देवाचं स्थान दिलं होतं. अरुण गोवील यांनी १९७७ मध्ये आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. ताराचंद बरजात्या यांच्या पहेली चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्यांनी ‘सावन को आने दो’, ‘सांच के आंच नही’ असे काही हिट चित्रपट दिले.

pooja sawant and siddhesh chavan performed satyanarayan pooja
लग्नानंतर पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण यांनी जोडीने केली सत्यनारायण पूजा! बहिणीने शेअर केला खास फोटो
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका

विक्रम आणि वेताळ मालिका केल्यानंतर अरुण गोवील यांना रामायणसाठी ऑफर मिळाली. “मला आठवतं मी प्रभू रामाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. पण माझी निवड झाली नाीह. नेमकं काय झालं माहिती नाही. माझा फोटोशूट करण्यात आला, पण मी भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हतो. पण नंतर आम्ही चेहरा हसरा ठेवायचं ठरवलं आणि सगळं काही सुरळीत झालं”.

या कार्यक्रमामुळे अरुण गोवील यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांची भूमिका लोकांना प्रचंड आवडली होती. पण याचा एक तोटाही अरुण गोवील यांना झाला. “रामायण नंतर माझं फिल्म करिअर जवळपास संपलं. मी त्याआधी चित्रपट करत होतो. पण ही भूमिका इतकी प्रसिद्ध झाली की मला चित्रपटात दुसरं काम मिळालंच नाही. मी इतर मालिकांमध्ये काम करत या भुमिकेतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही,” असं अरुण गोवील सांगतात.

“पण नंतर माझ्या लक्षात आलं की, रामाची भूमिका करावी हे देवानेच माझ्यासाठी ठरवलं होतं. कितीजणांना अशी संधी मिळते? लोक मला अरुण गोवील नाही तर राम म्हणून हाक करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे,” असं अरुण गोवील सांगतात.

दुसरीकडे सीताची भूमिका निभावणाऱ्या दीपिका चिखलिया यांच्यासाठी मात्र संधीची अनेक दारं उघडली. त्यांना अनेक स्थानिक चित्रपटांध्ये काम मिळालं. यानंतर त्या राजकारणातही गेल्या. त्या पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळल्या आहेत. २०१९ मध्ये आलेल्या ‘बाला’ चित्रपटात त्यांनी यामी गौतमच्या आईची भूमिका निभावली.