News Flash

रामायणीतील लक्ष्मणाचा जुना फोटो होतोय व्हायरल, पाहून नेटकरी पडले प्रेमात

सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

लॉकडाउनच्या काळात लोकांना घरात बसून ९०च्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आता पुन्हा पाहता येत आहेत. या मालिकांमधील ‘रामायण’ या मालिकेने प्रेशकांच्या मनावर जादू केली आहे. तसेच मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर ट्रेंड होताना देखील दिसत आहेत. विशेष म्हणजे ३३ वर्षांनंतर मालिकेतील कलाकारांविषयी नव-नवीन माहिती समोर येत आहे. आता रामायणातील लक्ष्मणाचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रामायण मालिकेत लक्ष्मण ही भूमिका अभिनेते सुनील लहरी यांनी साकारली होती. आता त्यांचे वय ५९ वर्षे आहे. सध्या सोशल मीडियावर सुनील लहरी यांचा जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून हातात छत्री घेतलेली दिसत आहे. ते या फोटोमध्ये अतिशय हॅण्डसम दिसत असून त्यांनी लाखो तरुणींच्या मनावर जादू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रामायणातील लक्ष्मण या पात्रावर मीम्स देशील व्हायरल झाले आहेत. हे मीम्स सुनील लहरी यांनी पाहिले आणि ते मजेदार असल्याचे म्हटले होते.

सुनील लहरी यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतच नव्हे तर ‘विक्रम वेताळ’ या मालिकेत देखील काम केले आहे. १९९० रोजी ‘परम वीर चक्र’मध्ये काम केले होते. त्याआधी त्यांनी १९८० मध्ये ‘द नेक्सेलाइट्स’ या चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत भूमिका साकारली होती. सुनील यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 4:20 pm

Web Title: ramayan laxman actor sunil lahri old pictures viral fans crazy reaction avb 95
Next Stories
1 रंगोलीचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड; केआरकेचा उपरोधिक टोला
2 कंगनाच्या बहिणीचा ट्विटर अकाऊंट सस्पेंड; ट्विटरची कारवाई
3 ‘फिल्मस्टार नसतानाही शाहरुख…’, ३० वर्षांनंतर रेणुका शहाणेंचा खुलासा
Just Now!
X