28 September 2020

News Flash

‘झाडावर मोठा साप…’, दीपिका चिखलिया यांनी सांगितला शूटींग दरम्यानचा भयानक किस्सा

सोशल मीडियाद्वारे त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

लॉकडाउनच्या काळात ३३ वर्षानंतर ‘रामायण’ ही मालिका पुन्हा प्रदर्शित करण्यात आली. प्रेक्षकांनी तितक्याच उत्साहाने ती पाहिली. तसेच रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने पुन्हा अनेकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. मालिकेतील पात्र देखील पुन्हा एकदा चर्चेत होती. विशेष म्हणजे सीता हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलीया. त्यांनी ३३ वर्षानंतरही मालिकेतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच त्यांनी असाच एक किस्सा सोशल मीडियाद्वारे सांगितला असून त्याच्या चर्चा सुरु आहेत.

दीपिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो रामायण मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळीचा आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्यावेळी घडलेला किस्सा सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

There is a story behind this scene ….so I shared …we were busy with the shoot, learning lines and so on…the day was as normal as could be, after the scene got over our cameraman Ajit naik (cinematography) came to tell us please vacate the place and don’t stand underneath the tree and we were wondering all the three actors as to what was the hurry and why so abrupt …he asked all the technicians also to clear the field ..sagar Saab was also wondering what happened …and then he pointed out to a huge fat snake on the tree and what followed after that was we all RAN for our life sooo many memories ….#memories#ramayan#sagarworld# tree#banyantree#snake#fear#phobia#umbergoan#studio#sets#actors#actress#costume

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala) on

‘आम्ही शुटींगमध्ये व्यग्र होतो. कोणी डायलॉग आठवत होतं तर कोणी शांत बसले होते. नेहमी प्रमाणे सर्व काही सुरळीत सुरु होते. सीन शूट करुन झाल्यानंतर आमचे कॅमेरा मॅन अजित नाईक यांनी ती जागा खाली करण्यास सांगितली आणि त्या झाडाखाली उभे राहू नका असे म्हटले. आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. हे आम्हाला असे का सांगतायेत? अजित यांनी सेटवरील इतर टेक्निशियन्सला देखील ती जागा खाली करण्यास सांगितले. आम्हा सर्वांना कळेना हे असे का बोलतायेत’ असे दीपिका यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘सागर साहेबही आश्चर्यचकित झाले. त्यांनी अजितला विचारले काय झाले. त्यावर त्याने झाडावर बसलेल्या एका मोठ्या सापाकडे बोट दाखवले. त्यानंतर आम्ही सगळेजण जीव मुठीत घेऊन तेथून पळालो’ असे दीपिका यांनी पुढे म्हटले आहे. सध्या दीपिका यांची ही पोस्ट चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 6:16 pm

Web Title: ramayan sita aka dipika chikhlia share behind the scene photos and stories avb 95
Next Stories
1 ओटीटीवर सुपरस्टार यशचा ‘केजीएफ’ ठरतोय लॉकडाउन फेव्हरेट
2 …म्हणून जॅकलिनला पडतो लॉकडाउनचा विसर
3 १६ वर्षांच्या मुलाने केल्या अश्लिल कमेंट, स्क्रिनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणाली…
Just Now!
X