छोट्या पडद्यावरील काही मालिका अशा असतात ज्या आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात असतात. त्यापैकी एक म्हणेज ‘रामायण’ ही मालिका. दूरदर्शनवर लागणाऱ्या या मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मण या मुख्य पात्रांनी लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता या तीन भूमिका साकारणारे कलाकार ‘कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहेत.

नुकताच सोनी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रमो प्रदर्शित केला आहे. या प्रमोमध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, सीतेच्या भूमिकेतील दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी शोमध्ये हजेरी लावली असल्याचे दिसत आहे. दरम्यान कपिल मालिकेतील हनुमानाची भूमिका साकारणारे दारा सिंग यांच्याबद्दल बोलताना दिसतो. ‘पंजाबी लोक इंग्रजी खूप छान बोलतात पण हिंदी त्यांना तितकं चांगलं जमत नाही’ असे कपिल म्हणतो. त्यावर सुनील लहरी यांनी ‘सर्वांना पहिल्यांदाच कळाले असेल की मालिकेतील हनुमानाची भूमिका साकारणारे दारा सिंग पंजाबी होते’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : जाणून घ्या कपिल शर्माच्या सर्वात महागड्या ५ गोष्टी

त्यानंतर कपिल अरुण यांना म्हणतो, ‘जेव्हा लोकं तुम्हाला पाहून तुमची आरती करायचे तेव्हा सर तुमच्या मनात असे आले नाही का की अपुन इच भगवान है.’ ते ऐकून तेथे उपस्थित असलेल्या लोकांना हसू येते.