News Flash

रामानंद सागर यांच्या नातीच्या फोटोंचा सोशल मिडीयावर धुमाकूळ

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जाते.

साक्षीचे बोल्ड फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

आपण आजवर टेलिव्हिजनवर ब-याचदा रामायण पाहिले आहे. पण, आजही जेव्हा कधी रामायणाचा विषय येतो तेव्हा दूरदर्शन वाहिनीवरील रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जाते. आता तुम्ही म्हणाल की अचानक रामायणचा विषय कुठून आला. तर, रामानंद सागर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी त्यांचे नाव चर्चेत येण्यामागे त्यांची नात साक्षी चोप्रा ही आहे. तसेच, ती निर्माता मिनाक्षी सागर यांची मुलगी आहे.

साक्षीचे बोल्ड फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. साक्षीच्या या बोल्ड अंदाजाला सोशल मिडीयावर पसंतीही मिळत आहे. पण, साक्षी ही रामानंद सागर यांची नात असल्याचे ब-याच जणांना माहित नाहीये. ती लंडन येथे तिचे शिक्षण पूर्ण करत असून तिला संगीत क्षेत्रात रस आहे. तिने १० वर्षांची असताना वेस्टर्न वोकल्सचे प्रशिक्षण घेतले होते. १९ वर्षीय साक्षीचे फोटो पाहता जर पुढे जाऊन तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, पूजा बेदीची मुलगी आलिया, श्रीदेवीची मुलगी जान्हवी, शाहरुखची मुलगी सुहाना आणि सैफ अली खानची मुलगी सारा यांनी याआधीच त्यांच्या सुंदर फोटोंनी सोशल मिडीयावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. आता या स्टार किड्सच्या यादीत साक्षीच्याही नावाची भर पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:04 pm

Web Title: ramayana maker ramanand sagars great granddaughter sakshi chopras bikini pics are breaking the internet
Next Stories
1 हॅपी बर्थडे सुश्मिता सेन
2 ..म्हणून मी आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत नाही
3 आंतरराष्ट्रीय चित्रपटात शाहरुख-रणबीर दिसणार एकत्र
Just Now!
X