27 September 2020

News Flash

‘धुमधडाका’ चित्रपटातील अभिनेत्रीला रामदास आठवलेंनी दिला आसरा

लॉकडाउनमुळे पोलिसांनी या अभिनेत्रीला अडवले आणि मुंबईत परत जाण्याचे आदेश दिले

ध्या करोना व्हायरसमुळे देशात तिसरा लॉकडाउन घेण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेकजण घरापासून दूर अडकून पडल्याचे पाहायला मिळाले. अशा व्यक्तींना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, जेवण देण्यासोबतच एका वयोवृद्ध आणि गरजू मराठी अभिनेत्रीला आसरा दिला आहे.

ही अभिनेत्री म्हणजे ‘धुमधडाका’ या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या राणे आहेत. ऐश्वर्या या सिंधुदुर्ग येथील त्यांच्या गावाच्या दिशेन निघाल्या होत्या. मात्र लॉकडाउनमुळे पोलिसांनी त्यांना अडवले आणि मुंबईत परत जाण्याचे आदेश दिले. दरम्यान त्यांचे कपडे आणि सर्व सामान चोरीला गेले. त्यानंतर त्या मुंबईला परतल्या आणि त्यांनी आठवले यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून रामदास आठवलेंनी ऐश्वर्या यांना त्यांच्या घरात आसरा दिला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात लॉकडाउन सुरु झाल्यापासून आठवले हे वांद्रे येथील संविधान या आपल्या बंगल्यावर गरजू नागरीकांसाठी नित्यनेमाने अन्नधान्य वाटप आणि जेवणाची व्यवस्था करीत आहेत.

ऐश्वर्या यांनी ‘धुमधडाका’मध्ये अशोक सराफ यांच्या नायिकेचे काम केले होते. त्यांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्याबरोबर केलेले प्रियतम्मा हे गाणे विशेष गाजले होते. परंतु अशोक सराफ यांच्या प्रियतम्मा ओखळताही येणार नाही अशा अवस्थेत आहेत.

सध्या महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 7:31 pm

Web Title: ramdas athawale comes forward to help age old marathi actress aishwarya rane avb 95
Next Stories
1 ‘श्री कृष्ण’ मालिका आजपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे
2 ‘आपलं वैभवशाली सैन्य जनसंपर्काचं साधन बनलंय’; गायक विशाल दादलानीचा आरोप
3 राजामौलींनी रामायणावर चित्रपट करावा, चाहत्यांची मागणी
Just Now!
X