शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे वडील यशवंत पाध्ये यांनी भारतात शब्दभ्रमकला रुजविली. त्यांनी तयार केलेल्या ‘अर्धवटराव’ या बाहुल्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. रामदास पाध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अर्धवटराव यांची शंभरी जगभर साजरी करण्याचे ठरविले आहे. त्या अंतर्गत ‘कॅरी ऑन रामदास पाध्ये लाइव्ह’  कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी मुंबईत वरळी येथे नेहरू सेंटरच्या ‘नाटय़ महोत्सवा’त झाला. त्या निमित्ताने..

‘शद्बभ्रम’ ही एक वेगळी कला असून ‘बोलक्या बाहुल्या’ स्वरूपात त्याचे सादरीकरण आपण पाहिलेले आहे. एकेकाळी या कलेला भारतात फारशी मान्यता किंवा प्रतिष्ठा नव्हती. आज आपल्या देशातही ‘शब्दभ्रम’ कलेला प्रतिष्ठा मिळाली आहे.  ‘बोलक्या बाहुल्या’ म्हटले की मराठी माणसाला पहिले नाव आठवते ते रामदास पाध्ये यांचे. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून काही वर्षांपूर्वी रामदास पाध्ये यांनी ‘अर्धवटराव’ आणि ‘आवडाबाई’ या बाहुल्यांना घेऊन सादर केलेले कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘लिज्जत पापड’च्या जाहिरातीमधील ‘कर्रम कुर्रम लिज्जत पापड’ हे वाक्य प्रेक्षकांच्या ओठावर आहे. महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘तात्या विंचू’ हा बाहुलाही प्रेक्षक विसरलेले नाहीत. ‘बोलक्या बाहुल्यां’च्या या संसारात रमलेल्या रामदास पाध्ये यांना त्यांच्या पत्नी अपर्णा यांची साथ मिळाली. आता रामदास व अपर्णा आणि त्यांची दोन मुले सत्यजित व परीक्षित आणि सत्यजितची पत्नी व रामदास-अपर्णा यांची सून ऋतुजा हे सगळेच कुटुंबीय ‘बोलक्या बाहुल्या’मय झाले आहेत.

nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
शब्दभ्रमकार रामदास पाध्ये हे वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे वडील यशवंत पाध्ये यांच्याबरोबर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तो  रामदास पाध्ये यांचा पहिला जाहीर कार्यक्रम.
शब्दभ्रमकार रामदास पाध्ये हे वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे वडील यशवंत पाध्ये यांच्याबरोबर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तो  रामदास पाध्ये यांचा पहिला जाहीर कार्यक्रम.

‘अर्धवटराव’ या बोलक्या बाहुल्याच्या शंभरीच्या निमित्ताने ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना रामदास पाध्ये म्हणाले, माझे वडील यशवंत पाध्ये यांनी भारतात ‘शब्दभ्रम’कला आणि बोलक्या बाहुल्या ही संकल्पना रुजविली. वडिलांनी त्या काळात बाहुल्या तयार करून त्याचे कार्यक्रम केले होते. त्यांनी तयार केलेल्या ‘अर्धवटरावा’ला शंभर वर्षे झाली ही बाहुली विश्वातील खूप मोठी घटना आहे. जगभरात शंभरी झालेले बाहुले आहेत, पण ते संग्रहालयात राहिले आहेत. ‘अर्धवटराव’ आजही लोकांचे मनोरंजन करत आहे. या शंभरीच्या निमित्ताने अर्धवटराव आणि आपली शब्दभ्रमकला देशात आणि परदेशातही पोहोचवावी या उद्देशाने आम्ही पाध्ये कुटुंबीयांनी वर्षभर विविध कार्यक्रम करायचे ठरविले आहे.

या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना पाध्ये यांनी सांगितले, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आम्ही दीड ते दोन तासांचा हा विशेष कार्यक्रम करणार आहोत.  ‘कॅरी ऑन एन्टरटेन्मेंट रामदास पाध्ये लाइव्ह’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. ‘बाहुली नाटय़ा’चे वेगवेगळे प्रकार यात आम्ही सादर करणार असून ‘अर्धवटराव’सह आम्ही तयार केलेल्या ५० हून अधिक बाहुल्या यात असतील. बोलक्या बाहुली विश्वात आम्ही जे नवीन प्रयोग केले ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. बोलक्या बाहुल्यांच्या विश्वात जे काही बदल झाले, नवीन तंत्र आले तेही लोकांपुढे यावे हा कार्यक्रम करण्यामागचा आणखी एक उद्देश आहे.

वर्षभरातील या कार्यक्रम उपक्रमाला पाध्ये कुटुंबीयांचे हितचिंतक, मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले आहे. या शंभरी सोहळ्याची सांगता आम्ही मुंबईतच करणार आहोत. ‘बोलक्या बाहुल्या’ या विषयावर एक कॉफी टेबल बुक काढायचाही आमचा मानस आहे. ‘अर्धवटराव’ हा एक ‘बोलका बाहुला’ असला तरी तो बाहुला आहे असे आम्ही मानत नाही. तो आमच्या घरातील एक सदस्यच आहे. आपल्या घरातील ‘आजोबा’ शंभरीचे झाले तर आपण त्यांची शंभरी जशी साजरी करतो त्याचप्रमाणे आम्ही पाध्ये कुटुंबीय अर्धवटरावची शंभरी उत्सााहाने साजरी करणार असल्याचेही रामदास पाध्ये म्हणाले.