05 March 2021

News Flash

‘या’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एण्ट्री

सदानंद कुलकर्णी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून बिझनेस जगतात त्यांची वेगळी ओळख आहे.

रमेश देव

‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘छत्रीवाली’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एण्ट्री झालीय. सदानंद कुलकर्णी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून बिझनेस जगतात त्यांची वेगळी ओळख आहे. सदानंद कुलकर्णी पुण्यात त्यांची नात नीलम हिच्यासोबत राहतात. गायकवाड कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. अरुंधती म्हणजे विक्रमच्या आईला ते मुलीप्रमाणे मानायचे. अरुंधतीचा नवरा म्हणून सूर्यकांत यांची सदानंदरावाशी ओळख झाली. सूर्यकांतसाठी सदानंद म्हणजे आदर्श ठरले आणि ते त्यांना बिझनेस गुरु मानू लागले. आजारपणात विक्रमची आई म्हणजेच अरुंधतीने जगाचा निरोप घेतला. सदानंद यांची नात नीलम हिचं विक्रमशी लग्न व्हावं ही तिची अंतिम इच्छा होती. अरुंधतीची हीच इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने सदानंद यांची मालिकेत एण्ट्री झाली आहे.

विक्रम आणि मधुराचं नातं निर्णायक वळणावर असतानाच आता सदानंद यांच्या एण्ट्रीने ही गुंतागुंत आणखी वाढणार आहे. एकीकडे मधुरावरचं प्रेम तर दुसरीकडे आईची अंतिम इच्छा हा गुंता विक्रम कसा सोडवणार याची उत्कंठावर्धक कहाणी ‘छत्रीवाली’च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 3:55 pm

Web Title: ramesh deo entry in chhatriwali marathi serial on star pravah
Next Stories
1 ‘काम मिळवण्यासाठी सारानं अक्षरश: माझ्यापुढे हात जोडले!’
2 Bigg Boss 12 : ‘खोट्या शोची खोटी विजेती’; श्रीसंतची मॅनेजर दीपिका कक्करवर चिडली
3 #MeToo मोहिमेवर राणीनं मांडलेलं मत दीपिका, अनुष्कालाही खटकलं
Just Now!
X