26 January 2021

News Flash

‘माझी किडनी फेल होत होती, जीवाला धोका होता’- राणा डग्गुबती

त्याने एका चॅट शोमध्ये हे वक्तव्य केले आहे.

राजामौली यांच्या बाहुबली या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्र त्यावेळी विशेष चर्चेत होते. या चित्रपटात भल्लालदेव ही भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या आरोग्याशी संबंधीत केलेल्या वक्तव्यावरुन सुरु झाल्या आहेत.

नुकताच राणाने अभिनेत्री समांथा अक्किनेनीच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये समांथाने राणाला त्याच्या आजारपणाविषयी विचारले होते. दरम्यान राणाने त्याच्या आजारपणाविषयी सांगितल्यानंतर तेथे उपस्थित असलेले चाहते, समांथा हे सर्वच भावूक झाल्याचे दिसत आहे.

समंथाने राणाला तुझ्या आयुष्यात काय झाले होते असे विचारले आहे. त्यावर राणा, ‘जेव्हा आयुष्य फास्ट फॉर्वडमध्ये सुरु होते तेव्हा अचानक कोणी तरी पॉज बटण दाबल्यासारखे झाले होते. मला बीपीचा त्रास होता. किडनी फेल होत होती. ७० टक्के शक्यता ही मला हॅमरेज होण्याची होती आणि ३० टक्के धोका माझ्या जीवाला होता’ असे म्हणतो. ते ऐकून तेथे उपस्थित असलेले चाहते देखील भावूक होताना दिसतात.

यापूर्वी एका मुलाखतीमध्ये राणाने त्याला एका डोळ्याने कमी दिसत असल्याचे सांगितले होते. ‘मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मला माझ्या उजव्या डोळ्याने दिसत नाही. मला फक्त माझ्या डाव्या डोळ्याने दिसते. तुम्हाला दिसत असलेला माझा उजवा डोळा मला एका व्यक्तीने मृत्यूनंतर डोनेट केला आहे’ असे राणाने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी राणाने हैद्राबादमध्ये मिहिका बजाजशी लग्न केले. त्याच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याने लग्न केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2020 11:06 am

Web Title: rana daggubati talks about his critical health condition in samantha akkineni show avb 95
Next Stories
1 ‘माझे फोटो डिलिट करा’; ‘दंगल गर्ल’ झायराची चाहत्यांना विनंती
2 तेव्हा सलीम खान यांनी भोगली सलमानची शिक्षा; कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
3 ‘इंदू की जवानी’चा ट्रेलर प्रदर्शित; पाहा कियारा- आदित्यची भन्नाट केमिस्ट्री
Just Now!
X