‘बाहुबली’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या अभिनेता राणा डग्गुबती म्हणजेच चित्रपटातील ‘भल्लालदेव’ने खलनायकी भूमिकेतूनही प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. गेल्या काही दिवसांपासून राणाने अमेरिकेला जाऊन किडनी प्रत्यारोपण केल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. मात्र या सर्व चर्चांवर आता राणाने त्याचे मत मांडत पूर्णविरामा लावला आहे.
राणा डग्गुबत्तीने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मी माझ्या आगामी प्रोजेक्टसाठी अमेरिकेला आलो आहे आणि माझ्या येत्या चित्रपटासाठी मी काही स्पेशल इफेक्ट कंपनीची भेट घेत आहे’ असे राणा म्हणाला आहे. ‘मी टेक्नीकलर प्री-प्रोडक्शन फॅसिलीटी स्टूडिओला भेटणार असून हिरण्यकश्यपच्या डिजिटल डोमेनवर काम करणार आहे’ असे राणा पुढे म्हणाला आहे.
सध्या राणा त्याच्या आगामी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर कदाचित तो हॉलिवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याची बहुतांश शूटिंग मुंबईत होणार आहे. त्याशिवाय तो आगामी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातही झळकणार आहे.
चित्रपटसृष्टीतील आठ वर्षांच्या कारकिर्दीत राणाने विविध भूमिका साकारल्या. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली द बिगनिंग’ आणि त्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘बाहुबली द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2019 11:18 am