बॉलिवूडमधील काही कलाकारांची चांगलीच मैत्री जमते. अर्जुन कपूर- रणवीर सिंग असो, अजय देवगण- रोहित शेट्टी असो किंवा मग रणबीर कपूर आणि अभिषेक बच्चन. कलाविश्वात त्यांच्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगते. त्यातही जर दोघांची आवड-निवड एकच असेल तर ती मैत्री आणखीनच खुलते. अभिषेक आणि रणबीरमध्येही अशीच मैत्री पाहायला मिळते. दोघांनाही फुटबॉलची प्रचंड आवड आहे. अशाच एका फुटबॉल सामनादरम्यान मैदानावर या दोघांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळाला.

वाचा : ‘गोठ’ आणि ‘छोटी मालकीण’चा शुक्रवारी होणार महासंगम

रणबीर आणि अभिषेकचा एक व्हि़डिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तो व्हायरल होण्यामागे कारणही तसंच आहे. मैदानात कतरिना कैफचं ‘काला चष्मा’ हे गाणं वाजत होतं आणि त्या गाण्यावर या दोघांनी ठेका धरला. विशेष म्हणजे कतरिनाच्या या गाण्यावर दोघांनी ऐश्वर्याचा ‘कजरा रे’ या गाण्यातील सिग्नेचर स्टेप केली.

पाहा हा व्हिडिओ :

https://www.instagram.com/p/Bh9LnNDgoHT/