26 September 2020

News Flash

रणबीर-आलियाचा तो फोटो पाहून सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या

सध्या रणबीर आणि आलियाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

संपूर्ण जगभरात २ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आले आहे. बॉलिवूड कलाकारांपासून ते सामन्य माणूस सर्वांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. अंबानी परिवानेदेखील बाप्पाच्या येण्याची जोरदार तयारी केली. गणेश चतुर्थीचे आमंत्रण देण्यासाठी अंबानी परिवाने स्पेशल कार्ड छापले होते. अनेक बॉलिवूड कलाकरांनी अंबानी कुटुंबीयांचा मान ठेवून बाप्पाचा आशिर्वाद घेण्यासाठी अॅन्टीलिया येथे हजेरी लावली. या कलाकारांमध्ये बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रणबीर आणि आलिया एकत्र बाप्पाचा आशिर्वाद घेण्यासाठी अॅन्टीलिया येथे पोहोचले. दरम्यान आलियाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या पारंपरिक लूकमध्ये आलिया अत्यंत क्यूट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. तर दुसरीकडे रणबीरने राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोघांनीही एकत्र फोटोग्राफरला पोज दिली. दरम्यान आलिया आणि रणबीरची केमेस्ट्री पाहण्यासारखी होती. ते दोघेही एकत्र आनंदी दिसत होते. या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

#aliabhatt #ranbirkapoor for #ambaniganpati #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रणबीरने आलियाचे वडिल महेश भट्ट यांच्याकडे आलियासाठी लग्नाची मागणी घातली असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले होते. रणबीरने आलियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून रणबीरने महेश भट्ट यांची भेट घेतली आणि आलियसाठी लग्नाची मागणी घातल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाची मागणी करताना रणबीर भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर रणबीर आणि आलिया २०२०मध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

 

View this post on Instagram

 

#ranbirkapoor #aliabhatt

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

काही दिवसांपूर्वी गणेश चतुर्थीचे आमंत्रण देण्यासाठी अंबानी परिवाने स्पेशल कार्ड छापले. या कार्डमध्ये अंबानी परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या असून सर्वांना बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अंबानी परिवाराने आमंत्रण दिले आहे. दरम्यान बाप्पाची आरती ९ वाजता केली जाणार असल्याचेदेखील म्हटले आहे. तसेच अंबानी परिवाराने बाप्पाच्या आगमनासाठी अॅन्टीलिया येथे रोशनाईचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 7:27 pm

Web Title: ranbir and alia visit ambanis ganesh utsav together avb 95
Next Stories
1 रानू मंडल यांच्याबाबत गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणतात….
2 नेहा कक्करने अनोख्या पद्धतीने दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
3 Article 370 : ओमर अब्दुल्लांची सुटका करा; पूजा बेदीचे पंतप्रधानांना आवाहन
Just Now!
X