23 April 2019

News Flash

..तर ‘तख्त’मध्ये विकीऐवजी रणबीर झळकला असता

करणचा हा बिग बजेट चित्रपट २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

रणबीर कपूर

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने नुकतीच त्याच्या आगामी ‘तख्त’ या बिग बजेट चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटानंतर करणने पुन्हा एकदा दिग्दर्शकाची धुरा सांभाळण्यास तयार झाला आहे. ‘तख्त’मध्ये बड्या स्टारकास्टची निवड करण्यात आली असून या चित्रपटाविषयी एक नवा खुलासा झाला आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशलच्या जागी रणबीर कपूरची निवड करण्यात येणार होती. मात्र रणबीरने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं समोर आलं आहे.

करणचा हा बिग बजेट चित्रपट २०२० रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये तगड्या स्टारकास्टचा भरणा करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर सिंह आणि विकी कौशल हेदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणार आहेत. मात्र विकी कौशल साकारणार असलेल्या भूमिकेसाठी यापूर्वी अभिनेता रणबीर कपूरच्या नावाचा विचार सुरु होता. करणने याविषयी रणबीरला विचारलंही होतं. मात्र या चित्रपटासाठी तारखा उपलब्ध नसल्यामुळे त्याने या चित्रपटासाठी नकार दिल्याचं समोर आलं आहे.

‘संजू’ चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर रणबीरच्या पदरामध्ये अनेक चित्रपट पडले आहेत. त्यामुळे सध्या रणबीरकडे ‘ब्रह्मास्त्र’ ,’शमशेरा’ आणि ‘लवरंजन’ हे चित्रपट असून त्याला ‘तख्त’ची स्क्रिप्ट आवडली होती. मात्र तारखा उपलब्ध नसल्यामुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला. ऐतिहासिक कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये करिना कपूर खान, रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत.

 

First Published on August 11, 2018 10:51 am

Web Title: ranbir denies to work with ranveer