News Flash

अमिताभ बच्चन यांच्याकडून रणबीर कपूरचे कौतुक

मोठा अभिनेता असे त्यांनी रणबीरचे वर्णन करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे

अमिताभ बच्चन सध्या शूजित सरकार यांच्या आगामी पिंक चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटात ते एका वकिलाची भूमिका बजावणार आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अभिनेता रणबीर कपूरचे कौतुक केले आहे. मोठा अभिनेता असे त्यांनी रणबीरचे वर्णन करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजूबा’ चित्रपटामध्ये तुम्ही रणबीर कपूरला पाहिले होते का, असा प्रश्न अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर या दोन्ही अभिनेत्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून चाहत्यांना विचारला होता. याच ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी २५ वर्षांनंतर मोठा अभिनेता झालेला असे रणबीरचे वर्णन केले आहे.
अमिताभ बच्चन सध्या शूजित सरकार यांच्या आगामी पिंक चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटात ते एका वकिलाची भूमिका बजावणार आहेत. अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी यांच्या भूमिका असलेल्या सुजय घोष निर्मित तीन याही चित्रपटात अमिताभ बच्चन दिसणार आहेत.
रणबीर कपूर ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘जग्गा जासूस’ या दोन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2016 4:25 pm

Web Title: ranbir kapoor a huge star amitabh bachchan
टॅग : Ranbir Kapoor
Next Stories
1 कपिल शर्मा ‘कलर्स’ वाहिनीबद्दल काय म्हणाला?
2 खऱया आयुष्यात मी एक फकीर- शाहरुख खान
3 आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या व्यवस्थापकाच्या दाव्यावर प्रियांकाने मौन सोडले
Just Now!
X