News Flash

नवरीवानी नटली आलिया तर रणबीर झाला म्हातारा, पण कशासाठी?

सोशल मीडियावर सुरु आहे दोघांचा धुमाकूळ

आलिया भट आणि रणबीर कपूर ही जोडी सध्या चित्रपटप्रेमींच्या मनावर राज्य करत आहे. हे दोघे कायमच चर्चेत असतात मग ते त्यांच्या अफेअरमुळे असू दे किंवा त्यांच्या चित्रपटांमुळे…पण आता हे दोघे चर्चेत येण्याचं कारण वेगळंच आहे. ते चर्चेत आहेत त्यांच्या नव्या लूकमुळे….

या त्यांच्या नव्या लूकमध्ये आलिया अगदी नवरीसारखी नटली आहे तर रणबीर मात्र अगदी जख्ख म्हातारा दिसत आहे. जाहिरातीसाठी या दोघांनीही हा नवा लूक केल्याचं समोर येत आहे. दोघेही वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये काम करत आहेत.आलियाने आपली ही जाहिरात शेअर केली आहे. एका चॉकलेटच्या ब्रँडची ही जाहिरात आहे. यात आलिया नवरी झाली आहे तर ‘थप्पड’ चित्रपटातला पवैल गुलाटी तिचा नवरा झाला आहे.  यात आलियाने बदामी रंगाचा पोशाख परिधान केला आहे आणि ती लग्नातला वरमाला हा विधी करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

नेटकऱ्यांना आलियाचा हा लूक फारच आवडलेला दिसत आहे. काही जणांनी आलियाला “सर्वात सुंदर नवरी”, असं म्हटलं आहे. तर आलियाच्या एका चाहत्याने तिला विचारलं आहे की, “खरोखर नवरी कधी होणार आहेस?” तर एका चाहत्याने इतकं बारीक निरीक्षण केलं आहे की तो म्हणतोय,  “या नवरीच्या पोशाखाला तर खिसेही आहेत.”

फक्त आलियाच नाही तर रणबीरही या लूकमध्ये चाहत्यांचं मन जिंकत आहे. एका मोठ्या रंगाच्या ब्रँडसाठीच्या या जाहिरातीत रणबीर डबल रोलमध्ये दिसत आहे. यात तो एका वृद्ध व्यक्तीची भूमिका करताना दिसत आहे. एका चाहत्याने सोशल मीडियावर या दोन्ही जाहिराती शेअर करत “अरे देवा, आता हे कोणी केलं”, असं म्हणत थट्टा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor (@ranbir_kapoooor)

ही लोकप्रिय जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातून दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे या दोघांचे फोटोजही व्हायरल होत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 5:46 pm

Web Title: ranbir kapoor alia bhatt new look for an advertisement vsk 98
Next Stories
1 ‘स्वत:ला आरशात बघितल्या नंतर मला तिरस्कार वाटायचा’, इलियाना डिक्रुझने केला खूलासा
2 “माझा नवा अल्बम म्हणजे माझ्या पत्नीला लिहिलेली प्रेमपत्रं”- निक जोनास
3 ‘तो कुठे आहे…’, वयाच्या ४२व्या वर्षी अभिनेत्री शोधतेय लग्नासाठी मुलगा
Just Now!
X