News Flash

रणबीर-आलियाच्या व्हायरल होणाऱ्या पत्रिकेमागचे सत्य काय?

लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमिवर त्यांना विविध मुलाखतींमधून अनेकदा लग्नाबाबत प्रश्न देखील विचारले गेले. मात्र, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत या प्रश्नांना नेहमीच बगल दिली आहे. परंतु आता मात्र, आलिया आणि रणबीरचे लग्न होणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. कारण त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या पत्रिकेवर लग्नाची तारीख २२ जानेवारी २०२० अशी लिहिण्यात आलेली आहे.

अर्थात ही पत्रिका किती खरी आहे, याबाबत अद्याप कोणतही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अलियाला या व्हायरल होणाऱ्या पत्रिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. परंतु “यावर आता मी काय बोलू” असे म्हणत तिने तिथून पळ काढला. दरम्यान आलियाने ही पत्रिका खोटी आहे अशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे नक्की ही पत्रिका खरी आहे का कोणी खोडसळपणा केला याबाबत खुसाला झालेला नाही.

पत्रिकेत काय लिहिले आहे?

सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेल्या या पत्रिकेवर रणबीर आणि आलिया यांचे नाव लिहिलेले आहे. परंतु कार्डवर आलियाच्या वडिलांचे नाव चुकीचे लिहिण्यात आले आहे. आलियाच्या वडिलांचे नाव महेश भट्ट आहे, मात्र कार्डवर मुकेश भट्ट असे लिहिलेले आहे. अलियाच्या वडिलांच्या नावात केलेल्या चुकीमुळे ही लग्न पत्रिका खोटी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 7:54 pm

Web Title: ranbir kapoor alia bhatt wedding card mppg 94
Next Stories
1 समीर धर्माधिकारी आणि मंगेश देसाईं यांचा ‘वाजवूया बँड बाजा’
2 कितीही नाकारलं तरी समाजात वर्णभेद हा आहेच- हर्षदा खानविलकर
3 कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी
Just Now!
X