News Flash

कतरिनामुळे रणबीरपासून दुरावला त्याचा हा मित्र?

आदित्य सगळं काही विसरुन कतरिनाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतो आहे

आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ आणि रणबीर कपूर

आदित्य रॉय कपूर आणि रणबीर कपूर यांच्यात खरंच मैत्री आहे की खूप चांगली मैत्री आहे. कारण त्यांच्यामध्ये आता आली आहे कतरिना कैफ. पण आता तुम्हाला वाटेल की परत प्रेमाचा त्रिकोण झाला की काय? पण तसे काही नाहीये. असे कळते की, सध्या कतरिना, रणबीर आणि आदित्यच्या मैत्रीमध्ये आली आहे.

आदित्य सगळं काही विसरुन कतरिनाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतो आहे. ये जवानी है दिवानी या सिनेमात रणबीर आणि आदित्यने एकत्र काम केले होते. दोघंही एकत्र पार्टीमध्ये जातात, फुटबॉलचे सामने खेळतात आणि एकत्र फिरताना त्यांना अनेकदा पाहिले आहे.
पण आता वाटत आहे की, कतरिनामुळे आदित्य आणि रणबीरमुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा येऊ शकतो. रणबीरने काही दिवसांपूर्वी त्याच्या नवीन घराची एक पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये आदित्य नव्हता. सिनेवर्तुळात अशी चर्चा आहे की, तेव्हा आदित्य, कतरिनासोबत फिरण्यामध्ये व्यग्र होता. याशिवाय दर रविवारी आदित्य, रणबीरसोबत फुटबॉलच्या सामन्यांना जायचा. पण आता तसे होत नाही. त्यामुळे रणबीर, आदित्यच्या या वागण्यावर नाखूश आहे.

कतरिना सहा महिन्यांपूर्वीच फेसबुकवर आली होती. तिच्यानंतर आता आदित्यनेही फेसबुकवर आगमन केले आहे. तो जसा फेसबुकवर आला त्याचे कतरिनाने फार प्रेमाने स्वागतही केले. पण विचार करण्याची गोष्ट म्हणजे खरंच आदित्य आणि रणबीरच्यामध्ये कतरिना येत आहे की, या दोघांच्या मैत्रीच्या दुराव्याचे कारण काही वेगळेच आहे.

संजय दत्तच्या जीवनावर आधारित सिनेमाची निर्मिती स्वतः संजूबाबा, राजकुमार हिराणी आणि विधू विनोद चोप्रा हे संयुक्तपणे करणार आहेत. दरम्यान, या सिनेमावर काम करण्याकरिता रणबीर सतत संजूबाबाची मदत घेत आहे. रणबीर यात संजूबाबाची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे, साँवरिया सिनेमाने रणबीरसह बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनम कपूर त्याच्यासोबत पुन्हा एकदा काम करताना दिसण्याची शक्यता आहे. सिनेमात संजयचे वडिल म्हणजेच सुनील दत्त यांची भूमिका अक्षय खन्ना आणि त्याच्या आईची भूमिका तब्बू साकारणार असल्याचे कळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 7:00 pm

Web Title: ranbir kapoor and aditya roy kapur are no more best friends because of katrina kaif
Next Stories
1 ‘राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून काय साधताय?’
2 दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रचारासाठी विन डिझेल भारतात येतोय!
3 अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची ‘चाहूल’
Just Now!
X