‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या दर दिवसाआड नवनव्या चर्चा रंगत आहेत. पाकिस्तानी कलाकारामुळे या चित्रपटाला होणारा विरोध, त्यानंतर ऐश्वर्या आणि रणबीरवर चित्रीत बोल्ड दृश्ये आणि सेन्सॉरसोबतचा वाद, कालाकारांच्या भूमिकांमध्ये काहीसे बदल करण्याचे दडपण अशा सर्व घटनांमुळे या चित्रपटामागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपण्याचे नावच घेत नाही आहे. पण सध्या हा चित्रपट आणि त्यातील कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांचे काही सुरेख फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
या चित्रपटामध्ये ऐश्वर्या एका वेगळ्याच भूमिकेमध्ये दिसत आहे. त्यातही चित्रपटाच्या ट्रेलरमधून आणि या नव्या फोटोंमधून या दोन्ही कलाकारांमध्ये असणारी केमिस्ट्री पाहता सध्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि रणबीरचे या चित्रपटातील बोल्ड सीन्स पाहता सेन्सॉर बोर्डाने काही सीन्सना कात्री लावल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण सध्या तरी अॅश आणि रणबीरचे हे हॉट फोटो अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
दरम्यान काही काळापूर्वी या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या भूमिकेऐवजी बी टाऊनचा नवाब सैफ अली खानची वर्णी लागू शकते अशा चर्चांना उधाण आले होते. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कोणतेही बदल या चित्रपटामध्ये करण्यात आलेले नाहीत. असे असले तरीही, मुळची पाकिस्तानी व्यक्तिरेखा असलेल्या ऐश्वर्याच्या पात्रामध्ये बदल करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. चित्रपटाच्या संहितेमध्ये काही बदल करत आता ऐश्वर्या लखनऊच्या एका मुसलमान स्त्रीची भूमिका साकाणार आहे. त्यामुळे या चर्चांना आलेले उधाण पाहता चित्रपटामध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. येत्या दिवाळीला म्हणजेच २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
New pic #aedilhaimushkil #ranbirkapoor & #aishwaryarai
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 1:00 pm
Web Title: ranbir kapoor and aishwarya rai photoshoot picture is going viral on internetCopyright © 2021 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.
Just Now!X