बी-टाऊनमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा कोणत्या जोडीची होत असेल तर ती आहे रणबीर कपूर-आलिया भट्ट. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे. पण त्यापूर्वीच त्यांच्यातील नातं जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाने विशेष लक्ष वेधून घेतलं. या 'लव्ह-बर्ड्स'ने स्टेजवर कपल डान्स करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. आलियाच्या 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातील 'इश्क वाला लव्ह' या गाण्यावर दोघंही थिरकले. आलियाला उचलून घेत रणबीरने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमातून दोघंही हातात हात घालून बाहेर पडले. त्याचेही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या प्रदर्शनानंतर रणबीर-आलिया लग्न करणार असल्याचंही वृत्त आहे. फक्त रणबीर नाही तर संपूर्ण कपूर कुटुंबीयांना आलिया पसंत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरएकमेकांना डेट करताहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. आलियाचा आई सोनी राजदान ही सुद्धा रणबीरची फॅन आहे. आलिया व रणबीर दोघे पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.