News Flash

रणबीर-दीपिका ‘या’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा येणार एकत्र?

संजय लीला भंसाळी रणबीर-दीपिकाला एकत्र आणण्यासाठी करत आहेत प्रयत्न

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी आहे. ‘बचना ऐ हसिनो’, ‘तमाशा’, ‘ये जवानी है दिवानी’ या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता ही जोडी प्रेक्षकांच्या आग्रखातर पुन्हा एकदा एकत्र झळकणार अशी चर्चा आहे. संजय लीला भंसाळी यांच्या आगामी चित्रपटात रणबीर दीपिका पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसतील अशी शक्यता आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – अभिषेकने शेअर केला ३९ वर्ष जुना व्हिडीओ; बिग बींनी अशी करुन दिली होती ओळख

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी आपल्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहेत. ‘बायजु बावरा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. दीपिका आणि रणबीरची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. जेव्हा त्यांनी या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी त्यांना दीपिकासोबत रणबीरला कास्ट करण्याचा सल्ला दिला. परिणामी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्यांनी रणबीर आणि दीपिकासोबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप दोघांनी या चित्रपटाला होकार दिलेला नाही. त्यामुळे येत्या काळात संजय लीला भंसाळी चित्रपटाची अधिकृत घोषणा करतील.

सर्वाधिक वाचकपसंती – “कशाला मदत करणार? मृतदेह उचलायला?”: मोदींच्या त्या ट्विटवर दिग्दर्शकाचा संताप

रणबीर आणि दीपिका कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दीपिकाने तर रणबीरच्या नावाचा टॅटू देखील गोंदवून घेतला होता. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे त्यांच ब्रेकअप झालं. पुढे दीपिकाने रणवीर सिंगशी लग्न केलं. आता हे एक्स बॉयफ्रेड-गर्लफ्रेंड पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार अशी चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 11:53 am

Web Title: ranbir kapoor and deepika padukone to reunite for sanjay leela bhansalis baiju bawra mppg 94
Next Stories
1 Video : सागर कारंडेशी धमाल गप्पा आणि भारत गणेशपुरेची सरप्राइज एण्ट्री
2 Video : जया बच्चन यांच्या ‘त्या’ शब्दांमुळे ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी
3 ‘गेल्या २२ वर्षापासून मी लॉकडाउनमध्ये’; अजयने देवगणचं मजेदार ट्विट
Just Now!
X