News Flash

रणबीर कपूरची छायाचित्रकारांना तंबी

सलमानसारखा राग नाही, मात्र छायाचित्रकारांना तंबी देण्याचे काम नुकतेच रणबीर कपूरने के ले आहे.

करोना असो, टाळेबंदी असो, परिस्थिती कुठलीही असो… कलाकारांना कॅमेऱ्यापासून दूर राहणे शक्यच होत नाही. बॉलीवूड कलाकारांना तर विमानतळापासून रुग्णालयापर्यंत सगळीक डे कॅ मेऱ्याचा सामना करावा लागतो. एरव्ही कलाकार आणि छायाचित्रकारांचे संबंध हे तसे मैत्रीपूर्णच असतात, मात्र कधी कधी कॅ मेऱ्याचा हा ससेमिरा कलाकारांना नकोसा होतो. आवरता आवरेना अशी कलाकारांची स्थिती असते, तर आहे त्या परिस्थितीत चांगल्यातले चांगले छायाचित्र काढून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याशिवाय छायाचित्रकारांसमोरही पर्याय नसतो. कधीतरी या मैत्रीत वादाची ठिणगीही पडते, सलमान खान आणि छायाचित्रकारांमध्ये झालेला वाद आणि बराच काळचा अबोला सगळ्यांनाच लक्षात असेल. सलमानसारखा राग नाही, मात्र छायाचित्रकारांना तंबी देण्याचे काम नुकतेच रणबीर कपूरने के ले आहे.

काही दिवसांपूर्वी रणबीरला करोनाची बाधा झाली होती, त्यातून बरा झाल्यानंतर आईबरोबर क्लिनिकमध्ये जाण्यासाठी बाहेर पडलेल्या रणबीरची छायाचित्रकारांशी गाठ पडली होती. अर्थात, त्या वेळी राज्यात संचारबंदी सुरू होती. अशा परिस्थितीत समोर इतक्या छायाचित्रकारांना पाहून ‘आप का लॉकडाऊन नही है क्या?’ असा प्रशद्ब्रा रणबीरने त्यांना विचारला होता. त्यावर छायाचित्रकारांनी आपलं काम सुरू असल्याचं त्याला सांगितलं होतं. रणबीर तेव्हाही नाराज होता, त्याने यामागचं कारणही त्यांना विचारलं, अखेरीस अंतरनियम पाळण्याचे आवाहन करत त्याने सुरक्षित अंतरावरून आपली छायाचित्रे काढू दिली. मात्र गमती गमतीत छायाचित्रकारांना प्रशद्ब्रा विचारणाऱ्या रणबीरच्या चेहऱ्यावरील नाराजी तेव्हाही लपली नव्हती. या घटनेला काही दिवस होतात न होतात पुन्हा एकदा आपल्या मागे लागलेल्या छायाचित्रकारांना तंबी देण्याचा प्रसंग त्याच्यावर ओढवला.

अभिनेता ऋषी कपूर यांना जाऊन एक वर्ष झाले, त्यानिमित्ताने अभिनेत्री नीतू कपूर यांनी आपल्या घरी श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी रणबीर आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री अलिया भट्ट दोघेही हजर झाले होते. अशा प्रसंगात खरंतर कॅ मेऱ्याचाच काय बाहेरच्या कोणाचीही भेट होणं कोणालाच न रुचणारं… मात्र इथे इमारतीच्या प्रवेशद्वारावरच छायाचित्रकारांना पाहून आरके  वैतागला. या वेळी मात्र त्याने आपली नाराजी बोलून दाखवली. ‘तुम्ही हे योग्य करत नाही आहात’, असे त्याने सुनावले. इतके च नाही तर आपल्यामागे कोणीही इमारतीत प्रवेश क रू नका, असेही त्याने सुनावले. अखेर उपस्थित छायाचित्रकारांनीही त्याच्याकडे दिलगिरी व्यक्त करत प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:12 am

Web Title: ranbir kapoor appeals photographers akp 94
Next Stories
1 सिनेमा ऐकण्याची गोष्ट!
2 शालेय रंगभूमीचे पाईक
3 २४ तासांत विराट-अनुष्काने जमवले साडे तीन कोटी रूपये ; चाहत्यांचे मानले आभार
Just Now!
X