25 September 2020

News Flash

रणबीर, राज कपूर आणि सोन्याचं नाणं; वाचा हा खास किस्सा

हे नाणं आजही रणबीरसाठी खास आहे.

बॉलिवूडचा ‘रॉकस्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूरचा आज वाढदिवस. त्यामुळे कुटुंबापासून, चाहत्यांपर्यंत सारेच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आलियानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या साऱ्यामध्ये त्याला दरवर्षी लक्षात रहावं असं एक खास गिफ्ट त्याच्या आजोबांनी अर्थात राज कपूर यांनी दिलं आहे.

२८ सप्टेंबर १९८२ साली जन्म घेणाऱ्या रणबीरला पाहताच सर्वात जास्त आनंद आजोबा राज कपूर यांना झाला होता, असं समोर आलं आहे. विशेष म्हणजे रणबीरला पाहताच राज कपूर यांनी त्यांच खानदानी सोन्याचं नाणं छोट्या रणबीरच्या हातात भेट म्हणून दिलं. हे नाणं आजही रणबीरसाठी खास आहे.

रणबीरला भेट म्हणून मिळालेलं हे नाणं विशेष असून त्याच्यावर अफगाणी भाषेत मजकूर कोरण्यात आला आहे. रणबीरचे पणजोबा बाश्वेश्वरनाथ कपूर हे पेशावरमध्ये तहसीलदार होते. त्यामुळे कपूर खानदान पेशावरशीदेखील जोडले गेले आहे. पेशावरमध्ये बाश्वेश्वरनाथ कपूर हे नॉर्थ वेस्ट फ्रंटिअर प्रोव्हिनेंसमध्ये राहत असत. त्यामुळे या नाण्यावरदेखील येथील कलाकुसर पाहायला मिळते. विशेष म्हणजे या नाण्याबरोबर राज कपूर यांनी रणबीरला एक सोन्याचा दागिनाही दिल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ऋषि कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या त्यांच्या पुस्तकामध्ये हा अनुभव शेअर केला आहे. तसंच रणबीर आणि राज कपूर यांच्या अनेक आठवणींना उजाळा देखील दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 2:23 pm

Web Title: ranbir kapoor birthday raj kapoor had got happy and wrote gifts in will
Next Stories
1 बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा तनुश्रीला पाठिंबा
2 Happy Birthday Ranbir Kapoor : आलियाने खास पद्धतीने दिल्या बॉयफ्रेण्ड रणबीरला शुभेच्छा
3 प्रदीप पटवर्धन “मोरूच्या मावशी”ची तिकिटं ब्लॅकमध्ये विकायचे?
Just Now!
X