भारतीय फुटबॉलला व्यावसायिक लीगचे कोंदण मिळवून देणाऱया इंडियन सुपर लीग(आयएसएल) या स्पर्धेतील मुंबई सिटी एफसी संघाचा मालक आणि अभिनेता रणबीर कपूरच्या मते बॉलीवूड सेलिब्रिटींचा खेळ क्षेत्रातील सहभाग हा अनेक कारणांनी फायदेशीर ठरणारा आहे.
रणबीर म्हणतो की, “देशात प्रत्येक खेळाला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. क्रिकेट हे आपले पहिले प्रेम असले तरी, कबड्डी आणि फुटबॉल खेळाला प्लॅटफॉर्म निर्माण न करु देणे असे होत नाही. या स्पर्धेतून दुसरे काही निष्पन्न होवो अथवा न होवो परंतु, यातून आपण युवकांना उत्तम फुटबॉलपटू किंवा कबड्डीपटू होण्याची संधी निर्माण करून देत असल्याचा आनंद आहे. असेही तो म्हणाला.
रणबीर सोबत अभिनेता जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन यांचेही संघ या स्पर्धेत आहेत. नुकतेच अभिषेक बच्चन सहमालक असलेल्या कबड्डी संघाने प्रो-कबड्डीच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. अभिषेक ‘इंडियन सुपर लीग’मधील चेन्नईच्या संघाचाही सहमालक आहे.