News Flash

Ranbir Kapoor: रणबीर कपूरने मुंबईत घेतला ३५ कोटींचा फ्लॅट

२४६० स्कवेअर फूटच्या फ्लॅटसाठी रणबीरने प्रति चौरस फुट १.४२ लाख रुपये मोजले.

अभिनेता रणबीर कपूरने मुंबईतील पाली हिल परिसरात ‘वास्‍तू’ अपार्टमेंट्समध्‍ये नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल ३५  कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. ही इमारत १२ मजली असून, ती कपूर कुटुंबीयाच्‍या बंगल्‍याजवळ आहे.
वास्तू पाली हिल या नव्याने बांधलेल्या टॉवरमध्ये सातव्या मजल्यावर रणबीरचा फ्लॅट आहे. २४६० स्कवेअर फूटच्या या फ्लॅटसाठी रणबीरने प्रति चौरस फुट १.४२ लाख रुपये याप्रमाणे ३५ कोटी रुपये मोजले आहेत.
गेल्या वर्षी अभिनेता अक्षय कुमार आणि आमिर खानने वरळी आणि पाली हिलमध्ये मालमत्ता विकत घेतल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 12:05 pm

Web Title: ranbir kapoor buys mumbai flat for rs 35 crore
टॅग : Ranbir Kapoor
Next Stories
1 लुलियाचेही सिक्स पॅक्स..!
2 ‘सैराट’ची ५५ कोटींची झिंगाट कमाई!
3 पुनर्भेट : भारदस्त!
Just Now!
X