News Flash

रणबीर कपूर कतरिनाला भेटू शकणार नाही

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरचा अभिनय असलेला 'फितूर' या आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरळीतपणे पार पाडून चित्रीकरण लवकर संपवण्याचा चंग दिग्दर्शक अभिषेक कपूरने बांधला...

| January 27, 2015 06:35 am

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरचा अभिनय असलेला ‘फितूर’ या आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरळीतपणे पार पाडून चित्रीकरण लवकर संपवण्याचा चंग दिग्दर्शक अभिषेक कपूरने बांधला आहे. लवकरच कतरिना कैफ, रेखा आणि आदित्य रॉय कपूर हे चित्रपटातील कलाकार चित्रीकरणासाठी काश्मिरला रवाना होणार आहेत. ‘मिसमालिनी डॉट कॉम’या संकेतस्थळावरील वृत्तानुसार, चित्रीकरणात खंड न पडण्यासाठी कतरिनाचा तथाकथित प्रियकर रणबीर कपूरला दिग्दर्शक अभिषेक कपूरने चित्रीकरणस्थळी येऊन कतरिनाला भेटण्यास मज्जाव केला आहे. याबाबत कतरिना आणि रणबीर या प्रेमीयुगलाचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेणे त्यांच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचे असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2015 6:35 am

Web Title: ranbir kapoor cannot meet girlfriend katrina kaif
Next Stories
1 मी ‘भारतरत्न’च्या योग्यतेचा नाही, अमिताभ यांचे ममता बॅनर्जींना उत्तर
2 ओबामांच्या भाषणातील उल्लेखाने शाहरुख कृतकृत्य
3 ‘स्वच्छ भारत’ अभियानातील सहभागासाठी पंतप्रधानांकडून सलमानच्या पाठीवर कौतुकाची थाप
Just Now!
X