News Flash

रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये WWEमधील सुपरस्टारची एण्ट्री?

तो भारतातील सर्वोत्कृष्ट किक बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.

लवकरच बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटात रणबीरसोबत त्याची खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंड आलिया भट्ट दिसणार असल्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता चित्रपटामध्ये WWE मधील सुपरस्टारची एण्ट्री झाल्याने चित्रपटाच्या चर्चांना उधाण आले आहे.

२०१३ मध्ये स्टार प्लस वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘महाभारत’ या मालिकेत भीम हे पात्र साकारणारा सौरव गुर्जर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जाते. तसेच तो चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

युद्ध कि तैयारी #mahabharat #stayhomestaysafe #pranipat #namaste #oldmemories

A post shared by SauravGurjar (@sauravgurjar) on

WWE रेसलर सौरव गुर्जर ‘महाभारत’ या मालिकेमुळे प्रकाश झोतात आला होता. ही त्याच्या करिअरमधील पहिलीवहिली मालिका होती. त्यामुळे अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी त्याला रजित कपूर यांच्याकडे पाठवण्यात आले होते. त्यांनी सर्वप्रथम सौरवला हिंदी भाषा बोलायला शिकवली. सौरव हा भारतातील सर्वोत्कृष्ट किक बॉक्सर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो मुळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.

आणखी वाचा : बॉलिवूड चित्रपटात झळकणार नागार्जुन, साकारणार ‘ही’ भूमिका

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असून अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन देखील दिसणार आहे. एकंदरीत चित्रपटाची तगडी स्टार कास्ट पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच आलिया आणि रणबीरची ऑन स्किन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी अयान मुखर्जीला तब्बल पाच वर्षांचा प्रदीर्घ कलावधी लागला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 3:09 pm

Web Title: ranbir kapoor film brahmastra wwe wrestler saurav gurjar entry avb 95
Next Stories
1 लॉकडाउनमुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; घरभाडं द्यायलाही उरले नाहीत पैसे
2 “मी गरीबांची अँजेलिना जोली नाही”; अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
3 “ही घटना पाहतोय हेच आपलं दुर्दैव”; अम्फन चक्रीवादळामुळे आयुषमान झाला दु:खी
Just Now!
X