News Flash

रणबीर कपूरला कुत्र्यानं घेतला चावा; चेहऱ्याला झाली जखम

याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

रणबीर कपूरला कुत्र्यानं घेतला चावा; चेहऱ्याला झाली जखम

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचे पाळीव प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे. त्याच्याकडे दोन पाळीव कुत्रे देखील आहेत. तो नेहमी त्यांच्यासोबत मस्ती करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. कुत्र्यांसोबत मस्ती करताना त्यातील एक कुत्रा रणबीरला चावला आहे. या घटनेनंतर रणबीर तातडीने रुग्णालयात दाखल झाला.

‘टाइम्स ऑफि इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीरच्या चेहऱ्याला कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे रणबीरच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे. रणबीर रुग्णालयात दाखल झाला असून, सध्या त्याचावर उपचार सुरू आहेत.

 

View this post on Instagram

 

they make everything better

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt) on

रणबीरने अथवा कपूर कुटुंबीयांकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भट्ट देखील रणबीरच्या पाळीव कुत्र्यांसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

 

View this post on Instagram

 

Time to show off some photography.. Ufff! #lovethypet

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt) on

काही दिवसांपूर्वी रणबीरने आई नीतू कपूरचा वाढदिवस साजरा केला होता. रणबीरची बहिण रिधिमा कपूरने या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला करण जोहरने देखील हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 1:29 pm

Web Title: ranbir kapoor gets bitten by his pet dog avb 95
Next Stories
1 करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना’ प्रदर्शित होणार या दिवशी
2 ‘आता पुरे झालं’; बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्यांवर अखेर रियाने सोडलं मौन
3 ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात
Just Now!
X